
Reading Inspiration Day : नगर : समाजभान येण्यासाठी व माणसातील संवेदना जागृत होण्यासाठी साहित्य वाचनाशिवाय पर्याय नाही. पुस्तकेच विस्कटलेली सामाजिक घडी पूर्ववत करू शकतात असे ठाम प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. संजय कळमकर (Dr. Sanjay Kalamkar) यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर व राधाबाई काळे महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. A.P.J. Abdul Kalam) यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन (Reading Inspiration Day) म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
नक्की वाचा : पारनेर नगरपंचायतीचे ८५ स्ट्रीट लाईट पोल गायब; ठेकेदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार

भावी संकल्पाची माहिती
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसिलदार तथा सामान्य प्रशासन व सदस्य सचिव, जिल्हास्तरीय मराठी भाषा समिती नागेश गायकवाड हे होते.यावेळी कळमकर यांनी विद्यार्थिनींना मोबाईल पासून दूर राहून व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण व प्रगल्भता जागृत करण्यासाठी दररोज वाचनाचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परीषदेचे सदस्य तथा जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य किशोर मरकड यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी भाषेतील समृद्ध साहित्याचा समाज जडणघडणीतील सहभाग अधोरेखित करुन वाचन संस्कृती वाढवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची व भावी संकल्पाची माहिती दिली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मान्यवरांना ‘बुके ऐवजी बुक’ देऊन सत्कार (Reading Inspiration Day)
याप्रसंगी तहसीलदार नागेश गायकवाड यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन व डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाला. आलेल्या मान्यवरांना ‘बुके ऐवजी बुक’ देऊन सत्कार केला यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या त्याचे मान्यवरांनी कौतुक केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त निबंध स्पर्धा,काव्यवाचन, वक्तृत्व स्पर्धा विजेत्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. सतीश शिर्के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. याप्रसंगी माध्यमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी भिवसेन पवार, सतीश तोडमल, महसूल सहाय्यक हरेश्वर सानप, उपप्राचार्य डॉ. भूपेंद्र निकाळजे, विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते. जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. अनिल जाधव यांनी आभार मानले.


