
District Bank Election : नगर : जिल्हा सहकारी बँकेच्या (District Cooperative Bank) निवडणुकीत सुरवातीलाच सक्रीय झालेले विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मधल्या काळात ही निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा झाली. मात्र, राम शिंदे अद्यापही वेगळ्याच मूडमध्ये असल्याचे आज पहायला मिळाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही दिवसच शिल्लक असताना शिंदे यांनी पुन्हा एकदा काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आपल्याशी कोणी चर्चा केलेली नाही. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख (Yashwantrao Gadakh) यांनी या चर्चेची सुरवात केली होती, तर त्यांनीच आता ती पुढे न्यावी. अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.
त्यांच्याच सुरात सूर मिसळत खासदार निलेश लंके यांनीही आपण वेट अँड वॉच च्या भूमिकेत असल्याचे म्हटले आहे. शनिवारी शिंदे आणि लंके यांची विश्रामगृहावर भेट झाली त्यानंतर या दोघांनीही प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
नक्की वाचा : अहिल्यानगर शहरात दुचाकी चोरणारे दोघे जेरबंद; चोरीच्या तीन दुचाक्या कोतवाली पोलिसांनी केल्या हस्तगत

एकत्र विचार विनिमय करण्याची आवश्यकता
शिंदे म्हणाले, निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा असेल तर सर्वांनी एक विचार आणि व एकत्र विचार विनिमय करण्याची आवश्यकता आहे. मात्र याबाबत कुठलीही एकवाक्यता असल्याचे दिसून येत नाही. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी बिनविरोध निवडणुकीची अपेक्षा व्यक्त केली होती. त्या दिशेने वारे वाहू लागले होते मात्र गडाख यांनी यासंबंधी काय सुरू आहे, हे सर्वांना सांगितले पाहिजे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी सकारात्मक आहे मात्र या निवडणुकीमध्ये बिनविरोध होण्यासाठी कोणाची अडचण आहे व कोणाचा अडथळा ठरत आहे, हे शोधलं पाहिजे. निवडणूक बिनविरोध यासाठी एक दिलाने चर्चा होत नाही तसेच इच्छुक स्वतः एकटे एकटे प्रचार करत आहेत. यामुळे सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असेही शिंदे म्हणाले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही आपल्यासोबत चर्चा केली नसल्याचे ते म्हणाले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत : खासदार लंके (District Bank Election)
यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले, की, आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. वरिष्ठांशी चर्चा करून बँकेच्या हिताचा कसा निर्णय होईल हे पाहिले जाईल. आमचा लढा प्रस्थापित विस्थापितांचा नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही जिल्हा बँक टिकली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. निवडणूक बिनविरोध होत असताना मनभेद व व्यक्ती द्वेष बाजूला ठेवून निवडणूक करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.


