Lal Krishna Advani Health Update : लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली, ICU मध्ये उपचार सुरू

0
Lal Krishna Advani Health Update : लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली, ICU मध्ये उपचार सुरू

नगर : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani Health Update) यांना शुक्रवारी(ता.१६) रात्री दिल्लीतील अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) दाखल करण्यात आले. ९८ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांच्या छातीत संसर्ग (Chest infection) झाल्याने त्यांना थेट आयसीयूमध्ये (ICU) नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

नक्की वाचा : ‘ऑक्टोबर हीट’चा फटका; राज्यात विजेची मागणी वाढल्याने पुरवठा खंडित

‘छातीत संसर्ग झाल्याने अडवाणी रुग्णालयात’ (Lal Krishna Advani Health Update)

अपोलो रुग्णालयाने एक हेल्थ बुलेटिन जारी करून सांगितले की, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या माहितीनुसार, ते सध्या आयसीयूमध्ये असून न्यूरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून आहे.

अवश्य वाचा : बेरोजगार सुषमाताईंचा पुन्हा एकदा अभ्यास कमी पडला’; विक्रम पाचपुते यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी रुग्णालयात दाखल होण्याच्या सुमारे आठवडाभरापूर्वी, ७ ऑक्टोबरला नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी मोदींनी २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अडवाणी यांचे आशीर्वाद घेतले. माजी उपपंतप्रधान अडवाणी यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली होती. त्यांनी म्हटले होते की, अडवाणींच्या दशकांच्या सार्वजनिक सेवेने आणि राष्ट्रजीवनातील त्यांच्या योगदानाने त्यांच्यावर खोलवर प्रभाव टाकला आहे. पंतप्रधान मोदींनी देशाची प्रगती मजबूत करण्यात अडवाणींच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचाही उल्लेख केला होता.

अडवाणी भाजपचे अनेकवेळा अध्यक्ष (Lal Krishna Advani Health Update)

लालकृष्ण अडवाणी यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. त्यांनी अनेक वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि २००२ ते २००४ या काळात देशाचे उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री यांसारखी महत्त्वाची पदेही भूषवली. भाजपला एक प्रमुख राष्ट्रीय पक्ष बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अडवाणी चार वेळा राज्यसभेचे आणि सात वेळा लोकसभेचे सदस्य होते.