Female Doctor : पाथर्डी : नवरात्रोत्सवाचे (Navratri Festival) औचित्य साधून विश्वविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पाथर्डी येथील शाखेत आयोजित श्रीदेवी आरती सोहळ्यात शहरातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला डॉक्टरांचा (Female Doctor) ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान करण्यात आला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून महिला सक्षमीकरणासोबतच (Women’s empowerment) पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यविषयक जनजागृतीचा संदेश देण्यात आला.
महिला डॉक्टरांच्या हस्ते श्रीदेवीची आरती
या सोहळ्यात डॉ. सोनाली भंडारी, डॉ. अंबिका वाघ, डॉ. स्मिता मुने, डॉ. सोनाली कचरे, डॉ. पूर्वा उरणकर, डॉ. कांचन माने, डॉ. ज्योती देशमुख, डॉ. आरती जायभाये आणि डॉ. शुभांगी सारूक या महिला डॉक्टरांच्या हस्ते श्रीदेवीची आरती करण्यात आली. संस्थेच्या संचालिका गायत्री मोदक शहाणे यांनी उपस्थित महिला डॉक्टरांचे स्वागत करून त्यांचा सन्मान केला.संस्थेच्या प्रतिनिधी साक्षी दायमा, प्रीती लवांडे यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी (Female Doctor)
डॉ. आरती जायभाये आणि डॉ. अंबिका वाघ यांनी बदलते हवामान, अतिवृष्टी, पूरस्थिती आणि दुष्काळ यांसारख्या परिस्थितींच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणे, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर कमी करणे, कापडी पिशव्यांचा अवलंब करणे आणि पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देणे आवश्यक आहे. छोट्या-छोट्या कृतींतूनही पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देता येते, असे आवाहन त्यांनी केले.अन्न, पाणी आणि पर्यावरणाच्या माध्यमातून सूक्ष्म प्लास्टिकचे कण मानवी शरीरात पोहोचू शकतात.
यावेळी संस्थेच्या संचालिका गायत्री मोदक शहाणे म्हणाल्या, नवरात्रोत्सव हा भक्ती आणि शक्तीचा उत्सव असून समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी आहे. कार्याचा गौरव करतानाच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य जागरूकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.



