Maharashtra Weather Update: राज्यात ५ दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

0
Maharashtra Weather Update: राज्यात ५ दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

नगर : राज्यात सध्या मान्सूनच्या अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाचे भीषण सावट आहे. या ऑक्टोबर हीटमुळे मुंबई, पुणे आणि नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra Weather Update) प्रचंड तापला आहे. तसेच नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या (Maharashtra Rain) उर्वरित सर्व भागांतून तसेच गोवा, कर्नाटक, तेलंगणा व ओडिशाच्या काही भागांतून आणि झारखंड व छत्तीसगडच्या आणखी काही भागांतून मागे फिरला असल्याचं हवामान विभागाने (Meteorological Department) अधिकृतपणे जाहीर केले आहे.

नक्की वाचा : लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली, ICU मध्ये उपचार सुरू

मात्र हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतातील काही भागांत हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारत आणि डोंगराळ प्रदेशातील अनेक भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचदरम्यान, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी देखील १७ ऑक्टोबरनंतर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होणार असल्याचं म्हटलं आहे.

अवश्य वाचा : जामखेडमध्ये युवकावर कोयत्याने हल्ला, मनगटापासून तुटला हात; कारण काय?

पंजाबराव डख यांचा अंदाज काय? (Maharashtra Weather Update)

हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या नवीन अंदाजानुसार, महाराष्ट्रात २० ते २५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान परतीचा पाऊस परतण्याची शक्यता आहे. १७ ऑक्टोबरपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहून तापमान वाढले आहे. १८ ऑक्टोबरनंतर वातावरणात बदल होऊन २० ते २५ ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडू शकतो. या पावसामुळे रबी हंगामातील पेरण्यांना तसेच ज्वारीच्या पिकाला फायदा होऊ शकतो. राज्यात १७ ऑक्टोबरपर्यंत कोरडे वातावरण राहणार आहे. पण यानंतर १८ ऑक्टोबरला वातावरणात बदल होणार आहे. दसरा झाल्यानंतर २० ते २५ ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस पडणार आहे. या परतीच्या पावसाने शेतकऱ्याची रब्बीची पेरणी होणार आहे. पण हा पाऊस सर्वदूर पडणार नाही. तो काही ठिकाणी पडेल तर काही ठिकाणी पडणार नाही.

१५ राज्यात मुसळधार पावसाचा इशारा (Maharashtra Weather Update)

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिंद, जालना, छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात पावसाचं स्वरुप जास्त असणार आहे. परतीचा हा पाऊस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही पडेल. पण तिथ सर्वदूर नाही तर काही ठिकाणीच पडेल, असा दावा पंजाबराव डख यांनी केला.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज १७ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश आणि बिहारसह १५ राज्यांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ताशी ७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही राज्यांत गारपीटही होऊ शकते. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे मोठी झाडे उन्मळून पडू शकतात. या खराब हवामानामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.