Educational Field Trips : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (Zilla Parishad Primary School) विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, संशोधन वृत्ती वाढावी, तसेच स्पर्धा परीक्षेची भीती कमी व्हावी यासाठी डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर (Dr. Vikram Sarabhai Space Centre) थुंबा केरळ या ठिकाणी या जाण्यासाठी शैक्षणिक वर्षांमध्ये आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीस (Educational Field Trip) जाण्यास घेण्यात आलेली निवड चाचणी परीक्षा नुकतीच संपन्न झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी जिल्हास्तर निवड चाचणी रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल अहिल्यानगर येथे घेण्यात आली . यासाठी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी काटेकोर नियोजन केले होते.
नक्की वाचा : भाजप नगरसेवक सागर मुर्तडकर यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयानेही फेटाळला; तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न
शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित
जिल्हास्तरीय परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्याचे तीन गटांमध्ये इयत्ता पाचवी ,सहावी व सातवी आणि आठवी तालुका स्तर निवड चाचणीत गुणांनुक्रमे प्रथम आलेले पाच विद्यार्थी याप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील एकूण पंधरा विद्यार्थी असे जिल्ह्यातील एकूण 210 विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. यासाठी शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित होते परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे यांनी कामकाज पाहिले .पर्यवेक्षणासाठी शिक्षण विभागातील विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख यांचा सहभाग होता. परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवार 23 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.eduprimaryanagar.in वर जाहीर करण्यात येईल .
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विमानाद्वारे शैक्षणिक सहल (Educational Field Trip)
या परीक्षेतून प्रत्येक तालुक्यातील इयत्तानिहाय पाचवी, सहावी, सातवी व आठवी या गटात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रत्येक तालुक्यातील तीन विद्यार्थी याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण 42 विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहलीसाठी निवड केली जाणार आहे . ह्या सहलीस पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच प्रत्येक वर्गातील जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना विमानाद्वारे शैक्षणिक सहलीस जाता येणार आहे . हा जिल्हा परिषदेचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम असून आज परीक्षेसाठी विद्यार्थी, शिक्षकांबरोबरच पालकांचीही उत्सुकता दिसून आली.



