
High Court : नगर : शहरातील नगर-पुणे रोडवर गेल्या महिन्यात तरुण व्यावसायिक रोहित पाथरकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले भाजप नगरसेवक सागर राजू मुर्तडकर (Sagar Murtadkar) (वय 32 वर्षे, रा. वंजार गल्ली, मंगलगेट) यांना न्यायालयाकडून दणका बसला आहे. जिल्हा न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुर्तडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुर्तडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court) औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र उच्च न्यायालयातही मुर्तडकर यांना दिलासा मिळू शकला नसून काल (दिनांक 16) झालेल्या सुनावणीत त्यांचा अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
नक्की वाचा : ‘माजदा आर्ट फाउंडेशन’ राष्ट्रीय कला स्पर्धेत अहिल्यानगरच्या नुरील भोसले यांच्या चित्रास द्वितीय क्रमांक
सरकारी पक्षाचा जामिनाला विरोध
गेल्या महिन्यात 14 सप्टेंबरच्या मध्यरात्री नगर-पुणे रोडवरील राजश्री हॉटेल समोर रोहित पाथरकर यांच्यावर हल्ला झाला होता. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सागर मुर्तडकर आणि त्यांच्या इतर चार साथीदारांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी काही दिवसांपूर्वी सागर मुर्तडकर यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने जामिनाला विरोध केला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शुक्रवारी झाली सुनावणी (High Court)
युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने नगरसेवक सागर मुर्तडकर यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान, त्यानंतर मुर्तडकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी यावर सुनावणी झाली व न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने एन. बी. नरवडे यांनी काम पाहिले.


