Sispe Infinity Scam : बहुचर्चित सिस्पे घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

दशरथ रोडे हा श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी फाटा परिसरात असल्याची गोपनीय माहिती

0
Sispe Infinity Scam : बहुचर्चित सिस्पे घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Sispe Infinity Scam : बहुचर्चित सिस्पे घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Sispe Infinity Scam : नगर : श्रीगोंदा येथील बहुचर्चित सिस्पे घोटाळा (Sispe Infinity Scam) प्रकरणात ठेवीदारांची फसवणूक (Fraud) केल्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. दशरथ विठ्ठल रोडे (वय ५१, रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. गव्हाणवाडी फाटा परिसरातून ही कारवाई करण्यात आली.

नक्की वाचा : सहकारात डॉ. विखे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार : पानसरे

आर्थिक गुन्हे शाखेने स्थानिक गुन्हे शाखेला कळविले

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. ठेवीदारांची फसवणूक झाल्याच्या या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने स्थानिक गुन्हे शाखेला कळविले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोधमोहीम (Sispe Infinity Scam)

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार गणेश लोंढे, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते आणि फुरकान शेख यांचे पथक नियुक्त केले. पथक आरोपीचा शोध घेत असताना दशरथ रोडे हा श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी फाटा परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.