Accused who stole gold arrested : बतावणी करून ज्येष्ठ महिलेचे सोने लुटणारा आरोपी अटकेत; ३.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Accused who stole gold arrested : बतावणी करून ज्येष्ठ महिलेचे सोने लुटणारा आरोपी अटकेत; ३.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पारनेर पोलिसांची कारवाई; दोन गुन्ह्यांची उकल, १६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत

Accused who stole gold arrested : पारनेर : पीकविम्याचा एक लाख रुपयांचा चेक मिळाल्याची बतावणी करून ज्येष्ठ महिलेचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला पारनेर पोलिसांनी अटक (Accused who stole gold arrested) केली आहे. ज्ञानदेव हरिभाऊ चेडे (वय ४२, रा. पुणेवाडी, ता. पारनेर, सध्या रा. इंदिरानगर, दौंड रोड, अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन गुन्ह्यांतील १६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ३ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भुरळ पाडून चाेरी (Accused who stole gold arrested)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन नारायण नवले (वय ७०, रा. नवलेवाडी, कान्हूर पठार) या कान्हूर पठार ते किन्ही रस्त्यावरील किन्ही शिवारातून जात असताना आरोपीने त्यांच्याशी ओळख वाढवून विश्वास संपादन केला. ‘तुमच्या पीकविम्याचा एक लाख रुपयांचा चेक बँकेत आला आहे. मी बँकेत काम करतो, तुम्ही माझ्यासोबत चला,’ असे सांगून त्याने त्यांना भुरळ पाडली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील कर्णफुले आणि वेल काढून घेतले.

या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८२४/२०२६ दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. त्याला अरणगाव, अहिल्यानगर येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने अशाच प्रकारचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ८३१/२०२६ देखील दाखल आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि सपोनि सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार योगेश ठाणगे करीत आहेत.