SIR : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आणि S.I.R. प्रक्रियेविरोधात अहिल्यानगरमध्ये भव्य मोर्चा

SIR : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आणि S.I.R. प्रक्रियेविरोधात अहिल्यानगरमध्ये भव्य मोर्चा

0
SIR : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आणि S.I.R. प्रक्रियेविरोधात अहिल्यानगरमध्ये भव्य मोर्चा
SIR : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आणि S.I.R. प्रक्रियेविरोधात अहिल्यानगरमध्ये भव्य मोर्चा

SIR : अहिल्यानगर : निवडणूक आयुक्तांचा राजीनामा, S.I.R. प्रक्रिया रद्द करणे आणि मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता राखणे या प्रमुख मागण्यांसाठी आज ‘S.I.R. विरोधी जनतेचा अखिल भारतीय मंच’च्या वतीने शहरात भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (मार्केट यार्ड चौक) ते दिल्लीगेट दरम्यान काढण्यात आला होता. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे सरचिटणीस श्री अशोक सब्बन आणि ॲड. श्री शाम असावा यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कामगार व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित (SIR)

दिल्लीगेट येथे झालेल्या जाहीर सभेत वक्त्यांनी EVM घोटाळे, मतचोरी आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलकांना झालेल्या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ आक्रमक भाषणे केली. या आंदोलनात कॉ. प्रवीण सोनवणे, कॉ. जीवन सुरडे, श्री युनुस तांबटकर, श्री सुशांत म्हस्के, श्रीमती मदिना शेख, श्री अविनाश साठे यांच्यासह विविध सामाजिक, कामगार व राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.