Bhanudas Kotkar : ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर अनंतात विलीन; केडगाव येथे राहत्या घराजवळ झाला अंत्यविधी

उपस्थितांनी दिवंगत भानुदास कोतकर यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली

0
Bhanudas Kotkar : ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर अनंतात विलीन; केडगाव येथे राहत्या घराजवळ झाला अंत्यविधी
Bhanudas Kotkar : ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर अनंतात विलीन; केडगाव येथे राहत्या घराजवळ झाला अंत्यविधी

Bhanudas Kotkar : नगर : अहिल्यानगरच्या राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर (Bhanudas Kotkar) (वय ७०) यांचे निधन (Death) झाले. त्यांच्या निधनाने शहरातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. केडगाव येथे सायंकाळी सहा वाजता त्यांच्या राहत्या घराजवळ अंत्यविधी करण्यात आला. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि समर्थकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. भानुदास कोतकर हे अहिल्यानगरच्या राजकीय क्षेत्रातील (Political Sphere) परिचित नाव होते. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या वाटचालीमुळे त्यांचे विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जाण्याने कोतकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नक्की वाचा : 35 वर्षीय महिलेवर गोळीबार; घटनास्थळावरून पसार झालेल्या तरूणाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

अनेकांशी आपुलकीचे संबंध

कोतकर कुटुंबाचे अहिल्यानगरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी असलेले संबंध लक्षात घेता, त्यांच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नेते म्हणून सार्वजनिक जीवनात वावरताना त्यांनी अनेकांशी आपुलकीचे संबंध जपले होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोक व्यक्त होत आहे. केडगाव येथील राहत्या घराजवळ अंत्यविधी पार पडला. यावेळी उपस्थितांनी दिवंगत भानुदास कोतकर यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने कोतकर कुटुंबीयांनी आपल्या ज्येष्ठ सदस्याला गमावले असून, त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील. भानुदास कोतकर यांच्या पश्चात माजी महापौर तथा उद्योजक संदीप कोतकर, सचिन कोतकर, अमोल कोतकर, सुवर्ण सचिन जगताप, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांची उपस्थिती (Bhanudas Kotkar)

यावेळी खासदार निलेश लंके, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डीले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे, अभय आगरकर, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, जिल्हा बँकेचे संचालक सचिन जगताप, महापालिकेचे उपमहापौर धनंजय जाधव, आदर्श हिवरे बाजारचे पोपटराव पवार, विठ्ठलराव लंघे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अनुराधा नागावडे, विनायक देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक निखिल वारे, मनोज कोतकर, राजाभाऊ कोठारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, सुजित झावरे आदींसह ग्रामस्थ, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.