Accident | अहिल्यानगर- जामखेड रस्त्यावर निंबोडी येथे अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

0

Accident | नगर :  अहिल्यानगर-जामखेड रोडवरील निंबोडी (ता. अहिल्यानगर) गावाजवळील हॉटेल उत्सवसमोर स्कॉर्पिओने तीन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. शनिवारी (ता.२४) रात्री ही घटना घडली. अपघातानंतर स्कॉर्पिओचा चालक वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला.

नक्की वाचा : ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर अनंतात विलीन; केडगाव येथे राहत्या घराजवळ झाला अंत्यविधी

एक जण जखमी (Accident)

या अपघातात रोहिदास नानासाहेब कडबने (वय ५१, सध्या रा. साई नंद कॉम्प्लेक्स, नगर-जामखेड रोड; मूळ रा. कडबनेवाडी, ता. जामखेड) आणि बाप्पू बाळासाहेब पवार (वय ४५, रा. टाकळीकाजी, ता. अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला. मयूर तुकाराम शिर्के (वय २६, रा. सारोळा बद्दी, ता. अहिल्यानगर) हे जखमी झाला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलीस घटनास्थळी दाखल (Accident)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निंबोडी गावातील हॉटेल उत्सवसमोर स्कॉर्पिओने तीन दुचाकींना धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी आणि मृतांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातातील स्कॉर्पिओचा चालक अपघातानंतर वाहन सोडून पळून गेला. पोलिसांनी अपघातातील सर्व वाहने टोचनच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात जमा केली असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here