Popatrao Pawar : अल्पावधीत होणारी अतिवृष्टी ही नेपाळइतकीच भारतासाठीही गंभीर समस्या : पोपटराव पवार

Popatrao Pawar : अल्पावधीत होणारी अतिवृष्टी ही नेपाळइतकीच भारतासाठीही गंभीर समस्या : पोपटराव पवार

0
Popatrao Pawar : अल्पावधीत होणारी अतिवृष्टी ही नेपाळइतकीच भारतासाठीही गंभीर समस्या : पोपटराव पवार
Popatrao Pawar : अल्पावधीत होणारी अतिवृष्टी ही नेपाळइतकीच भारतासाठीही गंभीर समस्या : पोपटराव पवार

Popatrao Pawar : नगर : जागतिक तापमानवाढीमुळे (Global Warming) हिमालयात घडणाऱ्या नैसर्गिक घडामोडींचे मान्सून आणि परतीच्या मान्सूनवर दूरगामी परिणाम होत आहेत. मान्सूनचे बिघडलेले गणित सुधारायचे असेल, तर हिमालयासोबतच भारताचा पश्चिम घाट सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हिमालय आणि पश्चिम घाटाचे संरक्षण हीच मानवी अस्तित्वाची खरी विकासवाट आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी केले.

विशेष कार्यशाळेचे आयोजन

नवी दिल्ली येथे ‘इनिशिएटिव्ह ऑफ मीडिया वुमेन्स नेपाळ’ यांच्या वतीने आयोजित भारत-नेपाळ कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नेपाळमधील रसुवा जिल्ह्यातील भोतेकोशी नदीच्या खोऱ्यात नुकत्याच घडलेल्या हिमकडा कोसळण्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तापमानवाढीच्या परिणामांवर संयुक्तपणे उपाययोजना करण्यासाठी भारत आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयांच्या पुढाकाराने या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी नेपाळच्या राजदूत कार्यालयाचे प्रमुख डॉ. सुरेन्द्र थापा, सीबीआयचे माजी संचालक डॉ. कार्तिकेयन, फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. दीपक जैन आणि इंडो-नेपाळ चॅप्टरचे मुख्य समन्वयक वेद प्रकाश शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पवार म्हणाले की, (Popatrao Pawar)

अल्पावधीत होणारी अतिवृष्टी ही नेपाळइतकीच भारतासाठीही गंभीर समस्या बनली आहे. कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी अशा टोकाच्या परिस्थितीमागे पर्यावरणाचे ढासळलेले संतुलन हे प्रमुख कारण आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अन्न आणि पाण्याचे मोठे संकट निर्माण होऊ शकते. हिमालय आणि पश्चिम घाटातील वाढता मानवी हस्तक्षेप तेथील परिसंस्थेला बाधा पोहोचवत आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांतील पर्यटनाला कडक सामाजिक शिस्त लावण्याची वेळ आली आहे.

तापमानवाढीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी डोंगर, शिवार आणि नद्यांच्या संरक्षणात लोकसहभाग व शासकीय मदत यांची सांगड घालणे आवश्यक आहे. दूषित आणि नापीक होत चाललेल्या मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यावर विशेष भर दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या ३५ वर्षांत हिवरे बाजारमध्ये राबविलेल्या पाणलोट विकासाच्या कामांमुळे कार्बन स्थिरीकरणाला मदत झाली आहे. गावाने जलव्यवस्थापन आणि पीक नियोजनात निर्माण केलेल्या सामाजिक व आर्थिक शिस्तीचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. यंदा केवळ ४० मिलिमीटर इतका अत्यल्प पाऊस पडूनही योग्य पाण्याचे नियोजन आणि पीक व्यवस्थापनाच्या बळावर गावातील शेतकऱ्यांनी १५ कोटी रुपयांचा कांदा विक्री केल्याचे पवार

भारत आणि नेपाळ यांची सांस्कृतिक व आध्यात्मिक विचारधारा समान असून, या दोन्ही देशांमधील ऋणानुबंध पश्चिम घाटापासून हिमालयापर्यंत जोडलेले आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी केवळ मोठ्या प्रकल्पांवर अवलंबून न राहता, स्थानिक पातळीवरील छोट्या घटकांवर लक्ष केंद्रित करणे आणि लोकसहभागातून निसर्गाचे संतुलन राखणे हाच प्रभावी मार्ग आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.