
Water scarcity : नगर : जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणीटंचाई (Water scarcity) व दुष्काळसदृश (Drought-like Conditions) परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिक, शेतकरी आणि पशुधनाला आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजनांना पूरक मदत म्हणून कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधी देणाऱ्या कंपन्या, सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, उद्योजक, फाउंडेशन, दानशूर व्यक्ती व इतर इच्छुक घटकांनी स्वेच्छेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी केले आहे.
नक्की वाचा : मुळा प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक; पाण्याच्या बचतीला सर्वोच्च प्राधान्य
स्थानिक गरजेनुसार मदत उपलब्ध करून देण्यावर भर
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलसंधारणाची कामे, नाला खोलीकरण व रुंदीकरण, गाळ काढणे, शेततळी व पाणीसाठवण संरचना निर्माण करणे, विहीर पुनर्भरण आणि जलपुनर्भरण यांसारख्या कामांसाठी सहकार्याची आवश्यकता आहे. तसेच पशुधनासाठी पाणी व चारा उपलब्ध करून देणे, दुष्काळामुळे प्रभावित कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य पुरविणे आणि आरोग्यविषयक मदत उपलब्ध करून देणे, अशा विविध बाबींमध्येही मदत अपेक्षित आहे.गावपातळीवरील पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्थानिक गरजेनुसार मदत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष गरज, टंचाईची तीव्रता आणि प्रशासकीय समन्वय लक्षात घेऊन मदतीचे स्वरूप निश्चित करण्यात येईल. या माध्यमातून जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या प्रयत्नांना पूरक बळ मिळण्यासह दुष्काळाच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यास मदत होणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सामाजिक कार्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य (Water scarcity)
अहिल्यानगर जिल्ह्यात सामाजिक कार्य करू इच्छिणाऱ्या CSR कंपन्या, स्वयंसेवी संस्था, फाउंडेशन आणि देणगीदारांना जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार आहे. संबंधित कामांसाठी आवश्यक परवानग्या, शासकीय विभागांशी समन्वय, गावनिहाय गरजा, टंचाईग्रस्त भाग आणि लाभार्थ्यांसंबंधी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावरून मदत केली जाईल. इच्छुक संस्था व कंपन्यांनी आपण कोणत्या स्वरूपात मदत करू इच्छिता, प्रस्तावित मदतीचे तपशील, अंदाजित निधी किंवा साहित्याचे प्रमाण, मदतीचे कार्यक्षेत्र आणि संपर्क व्यक्तीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क तपशील :
• मोबाईल : 7972889983
• ई-मेल : [email protected]
जिल्ह्यातील नागरिकांच्या पाणीटंचाई निवारणासाठी तसेच दुष्काळाच्या संभाव्य परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी सर्व संबंधित CSR कंपन्या, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, फाउंडेशन, देणगीदार आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे


