District Bank Election : नगर : जिल्हा बँकेच्या (District Bank) दहा संचालक पदांसाठी सोमवारी (ता.२) रोजी मतदान प्रक्रिया सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत जिल्हाभरातील ३३ मतदान केंद्रांवर (Polling Station) संपन्न झाली. मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान (Voting) केल्याचे चित्र सर्वदूर दिसून आले. एकूण ३ हजार ८३७ मतदारांपैकी ३ हजार ८०९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ९९.२७ इतकी आहे.
नक्की वाचा : पारनेरमध्ये शांततेत मतदान; लंके-शिंदे यांच्या प्रतिष्ठेची लढत
प्रतिनिधींसमक्ष मतमोजणीची प्रक्रिया होणार
सायंकाळपर्यंत सर्व मतपेट्या कडोकोट बंदोबस्तात कल्याण रोडवरील अमरज्योत लॉन्स येथील मतमोजणी केंद्रातीळ स्ट्रॉंग रुम मध्ये बंदिस्त ठेवण्यात आल्या असून त्याच ठिकाणी मंगळवारी (ता .३) सकाळी ९ वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधींसमक्ष मतमोजणीची प्रक्रिया होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. माघारीच्या अंतिम मुदती अखेर २१ संचालकांपैकी ११ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. उर्वरित दहा जागांसाठी मतदान प्रक्रिया सोमवारी संपन्न झाली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दहा जागांसाठी एकूण २७ उमेदवार निवडणूक रिंगणात (District Bank Election)
या दहा जागांसाठी एकूण २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात अकोले, राहुरी, पारनेर आणि कर्जत या सोसायटी मतदारसंघासाठीच्या चार जागा, महिला राखीव दोन, शेतीपूरक एक, इतर मागास वर्ग एक, अनुसूचित जाती जमाती एक आणि विमुक्त जाती भटक्या जमाती एक अशा दहा जागांचा समावेश आहे. सोमवारी (२ ऑक्टोबर) जिल्ह्यातील ३३ मतदान केंद्रांवर मतदान झाले. एकूण ३ हजार ८३७ मतदारांपैकी ३ हजार ८०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व मतदान केंद्रातील मतपेट्या उमेदवार प्रतिनिधींच्या समक्ष सील करण्यात आल्या. चोख पोलीस बंदोबस्तात या सर्व मतपेट्या मतमोजणी केंद्रात ठेवण्यात आल्या आहेत.



