
Urology Conference : नगर : इटलीतील फ्लॉरेन्स (Florence) येथे ११ ते १४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या इंटरनॅशनल युरॉलॉजी सोसायटी(एसआययु) च्या ४६व्या आंतरराष्ट्रीय युरॉलॉजी परिषदेत (Urology Conference) अहिल्यानगर येथील प्रख्यात युरॉलॉजिस्ट व अँड्रोलॉजिस्ट डॉ. स्वानित देशपांडे (Dr. Swanit Deshpande) यांची व्याख्यानासाठी निवड झाली आहे. या परिषदेत आयोजित ग्लोबल अँड्रोलॉजी फोरमच्या विशेष परिसंवादात सहभागी होण्यासाठी निवड झालेले ते भारतातील एकमेव अँड्रोलॉजिस्ट आहेत.
ही जगातील सर्वात मोठी युरोलॉजी /मूत्रविकार परिषद आहे . जगभरातील युरॉलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि संशोधक एकत्र आणणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत आधुनिक उपचारपद्धती, संशोधनातील प्रगती आणि पुरुषांच्या प्रजनन आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
नक्की वाचा : सहकार विकास आघाडीचे जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व; १७ जागांवर दणदणीत विजय
स्वतः चे संशोधन सादर करणार
डॉ. देशपांडे हे फ्लॉरेन्स येथे ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या Global Andrology Forum Symposium: Medical Management of Male Infertility – What Works, What Might, What Doesn’t या परिसंवादात ‘Managing Oligo- Astheno- Teratozoospermia Associated with Male Accessory Gland Infections’ या विषयावर आपले व्याख्यान सादर करण्यास निमिंत्रित केले आहे. पुरुषांच्या प्रजनन संस्थेतील सहायक ग्रंथींशी संबंधित संसर्ग किंवा दाह. पुरुष वंध्यत्वाच्या निदानामध्ये या समस्यांकडे कसे पाहावे, लक्षणे नसतानाही संभाव्य दाह किंवा संसर्ग कसा ओळखावा आणि योग्य रुग्णांमध्ये उपचारांचे महत्त्व काय, यावर ते स्वतः चे संशोधन सादर करणार आहेत. या सादरीकरणात डॉ. देशपांडे आपल्या संशोधनाचा अनुभव मांडणार आहेत. या अभ्यासातून पुरुष वंध्यत्वाच्या तपासणीमध्ये अधिक शास्त्रीय आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोनाची गरज अधोरेखित होणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
युरॉलॉजी पदवी सुवर्णपदकासह प्राप्त (Urology Conference)
डॉ. स्वानित देशपांडे यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून (MUHS) एम.सीएच. युरॉलॉजी पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली आहे. ते अहिल्यानगर येथील देशपांडे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि गुडन्यूज आयव्हीएफ सेंटर येथे युरॉलॉजी व अँड्रोलॉजी क्षेत्रात कार्यरत आहेत. पुरुष वंध्यत्व, शुक्राणूंच्या गुणवत्तेचे मूल्यमापन, मायक्रोसर्जिकल व्हेरिकोसीलेक्टॉमी, मायक्रो-टीईएसई आणि पुरुषांच्या प्रजनन आरोग्याशी संबंधित आधुनिक उपचारपद्धती हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतातील पुरुष वंध्यत्वविषयक संशोधन आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेतील अनुभव मांडण्याची संधी मिळाल्याने अहिल्यानगरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.


