
Mahavitaran Abhay Yojana : नगर : वीज बिलाच्या (Electricity Bill) थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना (Mahavitaran Abhay Yojana) सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून संबंधित ग्राहकांना थकीत वीज बिलाचा भरणा करून पुन्हा वीज जोडणी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ही योजना 6 नोव्हेंबर 2026 ते 15 जानेवारी 2027 पर्यंत असणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांनी केले आहे.
आर्थिक अडचणींमुळे वीज बिलाची थकबाकी
अनेक ग्राहकांकडे आर्थिक अडचणींमुळे वीज बिलाची थकबाकी राहिल्याने त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. अशा ग्राहकांना पुन्हा वीजपुरवठा सुरू करून घेण्यासाठी अभय योजना उपयुक्त ठरणार आहे. थकबाकीचा प्रश्न मार्गी लावून वीज ग्राहकांना दिलासा देणे, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
महावितरण कार्यालयाशी संपर्काचे आवाहन(Mahavitaran Abhay Yojana)
वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनी ही संधी गमावू नये. योजनेच्या अटी व सवलतींची माहिती घेऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी ग्राहकांनी जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
वीज ही प्रत्येक कुटुंबाची मूलभूत गरज असून, थकबाकीमुळे अंधारात राहण्याची वेळ आलेल्या ग्राहकांसाठी अभय योजना महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र ग्राहकांनी पुढाकार घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांनी स्पष्ट केले.


