
Water Scarcity : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पाऊस (Rain) कमी झाल्याने पाण्याची मोठी टंचाई (Water Scarcity) जाणवत आहे. शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळ (Drought) जाहीर करून उपाययोजना सुरू केल्या आहेत. सध्या जिल्ह्यात २९९ टँकरद्वारे २७५ गावे व १५७९ वाड्यांना पाणी पुरवठा होत आहे.
जिल्ह्यात सध्या २७५ गावे तहानलेली
पाण्यासाठी वाट पाहत असणारी माणसे, त्यांची जनावरे आणि शेतात सोन्यासारख उभ असलेल पिक ज्याला पाणी देऊ शकत नाही हे सध्या चित्र पहायला मिळत आहे. जिल्ह्यात सध्या २७५ गावे तहानलेली आहेत. नोव्हेंबर महिन्यात २९९ टँकरने पाणीपुरवठा जिल्ह्यात सुरु आहे. २०१६ साली जवळपास सर्वाधिक ८२७ टँकरने पाणी पुरवठा होत होता. आता तीच परिस्थिती येते की काय असे कुठे तरी जाणवायला लागले आहे. हे सर्व नोव्हेबर महिन्यातच पाणीटंचाईने भीषण रूप धारण केल आहे.बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सर्वाधिक टँकर हे दक्षिण नगर जिल्ह्यात (Water Scarcity)
जिल्हयात पावसाचे प्रमाण यावर्षी खुपच कमी असल्याने पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. सर्वाधिक टँकर हे दक्षिण नगर जिल्ह्यातील पाथर्डी, जामखेड, कर्जत, नगर, शेवगाव याठिकाणी आहेत. काही महिन्यापूर्वी टँकरची संख्या कमी होती पण जशी दुष्काळाची व तीव्रता जाणवू लागली तशी ती संख्या 300 वर आली.
नोव्हेंबर महिना चालू आहे अजून तर थंडी आत्ताच सुरू झाल. आणखी ७ महिने पावसाची प्रतीक्षा करायची आहे. त्यातही तीव्र स्वरूपाचा उन्हाळा. काही दिवसांत टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.


