
Case registered : नगर : अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या इम्पेरियल चौक (Imperial Chowk) परिसरात काल सायंकाळी नो पार्किंगच्या वादातून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) ओंकार घोलप 10 ते 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पांडुरंग माचिंद्र शिंदे, लतेश मनोज रणमले हे जखमी झाले जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत ओंकार घोलप, रा. माळीवाडा, अहिल्यानगर व इतर १० ते ११ अनोळखी व्यक्तींवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case registered) झाला आहे.
नक्की वाचा : फॅब्रिकेशन दुकानातुन १ लाख २४ हजारांचा ऐवज लंपास; एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
गाडीतुन बाहेर ओढून मारहाण
याबाबत माहिती अशी की, शिवा माणिक भोरे (वय १९ , धंदा-खाजगी नोकरी, रा.बाबासाहेब आंबेडकर कमानीजवळ, सिध्दार्थनगर, ता. जि. अहिल्यानगर) हे शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास इम्पेरीयल चौक येथे यातील संशयित आरोपी यांनी गैर कायदयांची मंडळी जमवून संगणमत करुन फिर्यादी व साक्षीदार मजकुर असे नो पार्कीग बाबत स्पिकरवर अलाऊसिंग करत असताना संशयित आरोपी घोलप व ४ अनोळखी इसम यांनी शिवीगाळ करुन पांडुरंग शिंदे यांना गाडीतुन बाहेर ओढून मारहाण केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
फिर्यादीत म्हटले की (Case registered)
तेव्हा लतेश रणमले हे वाहनातून खाली उतरून ओकांर घोलप यास बोलला की, तुम्ही शिवीगाळ का करता व माझ्या ड्रायव्हर पांडुरंग शिंदे याना मारहाण का केली असे विचारणा केली असता तेव्हा संशयित आरोपी घोलप म्हणाला की “तुम्ही लोक खुप माजले आहेत, तुमच्या कडे बघतो, तुम्ही कशा काय या रस्त्यावरच्या गाडया उचलतात मी तुमच्या कडे पाहतो, मी इथला दादा आहे “असे म्हणून मारहाण करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची माहिती मिळतात पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे कोतोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणे केली पुढील तपास पोलीस करत आहे.


