MIDC Police Station : फॅब्रिकेशन दुकानातुन १ लाख २४ हजारांचा ऐवज लंपास; एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

दुकानातील फॅब्रिकेशनचे साहित्य चोरून नेले

0
MIDC Police Station : फॅब्रिकेशन दुकानातुन १ लाख २४ हजारांचा ऐवज लंपास; एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
MIDC Police Station : फॅब्रिकेशन दुकानातुन १ लाख २४ हजारांचा ऐवज लंपास; एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

MIDC Police Station : नगर : निंबळक बायपास चौक येथील कोतकर वस्ती येथे फॅब्रिकेशनच्या दुकानात चोरट्यांनी शिरून १ लाख २४ हजार रुपयांचे साहित्य चोरून (By theft) नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल (Case registered) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : नगर क्लबच्या सचिवपदी नरेंद्र फिरोदिया यांची पाचव्यांदा निवडसर्व ११ संचालकांच्या जागा बिनविरोध

पत्रा उचकटून दुकानात प्रवेश

भाऊसाहेब दिगंबर लामटुळे (वय ४०, धंदा व्यवसाय, रा. पिंपळे कॉलनी, नागापूर, अहिल्यानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांचे निंबळक बायपास चौक, कोतकर वस्ती येथे साईकृपा फॅब्रिकेटर्स अँड वर्क शॉप नावाचे दुकान आहे. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ ते २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानात कशाच्या तरी सहाय्याने उजव्या बाजूचा वरील पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

फिर्यादीत म्हटले की (MIDC Police Station)

त्यानंतर दुकानातील फॅब्रिकेशनचे साहित्य चोरून नेले, असा एकुण एक लाख २४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाने हे करत आहेत.