Sanjeevani Engineering College : धनश्री चौधरीचे जर्मनीत उच्च शिक्षणाचे स्वप्न संजीवनीमुळे साकार !

Sanjeevani Engineering College : धनश्री चौधरीचे जर्मनीत उच्च शिक्षणाचे स्वप्न संजीवनीमुळे साकार !

0
Sanjeevani Engineering College : धनश्री चौधरीचे जर्मनीत उच्च शिक्षणाचे स्वप्न संजीवनीमुळे साकार !
Sanjeevani Engineering College : धनश्री चौधरीचे जर्मनीत उच्च शिक्षणाचे स्वप्न संजीवनीमुळे साकार !

संपूर्ण शिष्यवृत्ती, निवास, प्रवास, भोजनासह सर्व खर्च विद्यापीठ करणार, दरमहा एक लाख रुपयांचे स्टायपेंडही मिळणार


Sanjeevani Engineering College : कोपरगावः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, जिद्द आणि कर्तृत्वाची कमतरता नसते, गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची, संधीची आणि प्रोत्साहनाची. संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या (Sanjeevani Engineering College) याच शैक्षणिक गुणवत्तेचा आणि विध्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संस्थेने घेतलेल्या अथक परिश्रमांचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. महाविद्यालयाची धनश्री प्रणील चौधरी हिची जर्मनीतील जागतिक स्तरावर (Higher education in Germany) प्रतिष्ठित असलेल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ सारलँड’मध्ये एम.एस. (पदव्युत्तर पदवी) शिक्षणासाठी संपूर्ण शिष्यवृत्तीसह निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या दोन वर्षांच्या शिक्षणासाठी विद्यापीठाकडून तिचा निवास, प्रवास आणि भोजनासह संपूर्ण खर्च केला जाणार असून, इतर वैयक्तिक खर्चासाठी दरमहा भारतीय चलनानुसार सुमारे एक लाख रुपयांचे स्टायपेंडही दिले जाणार आहे. याशिवाय, दोन वर्षांच्या कालावधीसाठी पार्टटाइम नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्रही विद्यापीठाने दिले आहे.

संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी केले अभिनंदन

धनश्रीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी धनश्री व तिच्या पालकांचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी धनश्री, तिचे वडील प्रणील दगुराव चौधरी आणि आई स्वाती प्रणील चौधरी यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे आणि संजीवनी इंटरनॅशनल विभागाचे डीन डॉ. महेंद्र गवळी उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

धनश्रीची तैवानमधील इंटर्नशिपसाठी झाली होती निवड (Sanjeevani Engineering College)

धनश्रीने जून २०२६6 मध्ये संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.टेक. (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) ही पदवी पूर्ण केली. त्यानंतर संजीवनीच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तिने जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ सारलँडमध्ये एम.एस. प्रवेशासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू केली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, बी.टेक.च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असतानाच धनश्रीची तैवानमधील एका नामांकित विद्यापीठात तीन महिन्यांच्या संशोधन प्रकल्पावरील इंटर्नशिपसाठी निवड झाली होती. ही इंटर्नशिप पूर्णपणे प्रायोजित होती. तैवानमधील या संशोधन प्रकल्पादरम्यान मिळालेला अनुभव आणि संजीवनीतील प्राध्यापकांचे मार्गदर्शन यांचा तिला जर्मनीतील पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्यात मोठा फायदा झाला,अशी माहिती धनश्रीने दिली.


यावेळी धनश्रीचे वडील प्रणील चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, धारणगावसारख्या ग्रामीण भागातील मुलगी संजीवनीच्या मार्गदर्शनामुळे जर्मनीमध्ये संपूर्ण मोफत उच्च शिक्षण घेण्यासाठी जात आहे, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

संस्थापक स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांचे स्वप्न होते की, ग्रामीण भागातील गुणवंत विध्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षण, संशोधन आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. त्यांचे हे स्वप्न श्री नितीनदादा कोल्हे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली संजीवनीच्या माध्यमातून साकार होत आहे. ‘रूरल टू ग्लोबल’ हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून श्री नितीनदादांनी विध्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार, परदेशातील संशोधन प्रकल्प, प्रायोजित इंटर्नशिप आणि परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सुनियोजित रोडमॅप आखला आहे.

धनश्री चौधरीची जर्मनीतील नामांकित विद्यापीठात संपूर्ण शिष्यवृत्तीसह झालेली निवड हे याच दूरदृष्टीपूर्ण नियोजनाचे, संजीवनीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आणि प्राध्यापकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे फलित आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी संजीवनी सातत्याने प्रयत्नशील राहील.

– अमित कोल्हे (प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी)