Shri Bagalamukhi Shatchandi Mahayagya | श्री बगलामुखी शतचंडी महायज्ञाचे अहिल्यानगरमध्ये आयोजन; सदानंद सरस्वती महाराजांची उपस्थिती

0

Shri Bagalamukhi Shatchandi Mahayagya | नगर : पहिल्यांदाच श्री कालभैरव जयंतीच्या शुभ मुहूर्तावर श्री बगलामुखी शतचंडी महायज्ञाचे ( Shri Bagalamukhi Shatchandi Mahayagya ) आयोजन अहिल्यानगरमध्ये करण्यात आले आहे. द्वारका पिठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत मंगळवार (ता.१ डिसेंबर) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत या ऐतिहासिक महायज्ञाचे आयोजन गंगा उद्यान जवळील मिस्किम मळा येथे करण्यात आले आहे, अशी माहिती श्री पीतांबरा बगलामुखी शक्ती पीठम् चे मयुरेश विसपुते यांनी दिली.

नक्की वाचा : फॅब्रिकेशन दुकानातुन १ लाख २४ हजारांचा ऐवज लंपास; एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगरमध्ये प्रथमच आगमन

यानिमित्ताने सोमवारी (ता. ३० नोव्हेंबर) जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांचे नगरमध्ये आगमन होणार आहे. यज्ञस्थळी सायंकाळी ७ वाजता त्यांचे दर्शन व आशीर्वचन होणार आहे. जगद्गुरु शंकराचार्य श्री सदानंद सरस्वती महाराजांचे अहिल्यानगरमध्ये प्रथमच आगमन होत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच, इतक्या भव्य आणि दिव्य स्वरूपात द्वारका शारदा पीठम् चे शंकराचार्यांचे आगमन आणि ‘श्री बगलामुखी शतचंडी महायज्ञाचे’ आयोजन होत आहे. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जगद्गुरू शंकराचार्यांचे पावन आगमन व दर्शन सोहळा संपन्न होईल, तर १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता महायज्ञाचा प्रारंभ होऊन सायंकाळी ५ वाजता पूर्णाहुती होईल. दक्षिण भारतातून येणाऱ्या ५१ ब्राह्मण वृंदांकडून ३३ हवन कुंडीय महायज्ञ श्री मयुरेश गुरुजी विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या महायज्ञाने संपूर्ण परिसर चैतन्यमय आणि तेजोमय होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून भाविक उपस्थित राहणार आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

श्री बगलामुखी शतचंडी महायज्ञाचे महत्त्व

दशमहाविद्यांपैकी आठवी महाविद्या असलेली माँ पीतांबरा बगलामुखी ही ‘स्तंभन शक्तीची’ अधिष्ठात्री देवता आहे, जी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आणि संकटांना थांबवते. या शतचंडी महायज्ञामुळे जीवनातील कठीण अडथळे, शत्रूबाधा आणि न्यायालयीन किंवा मालमत्तेशी संबंधित वादविवाद दूर होऊन विजय व यश प्राप्त होते. तसेच ग्रहदोष शांत होऊन कुटुंबात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि ऐश्वर्याची वृद्धी होते अशी श्रद्धा आहे. अशा या अत्यंत शक्तिशाली महायज्ञाच्या दर्शनाने व सहभागाने भक्तांना दैवी ऊर्जेची प्रचिती येते.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच श्री कालभैरव जयंतीच्या विशेष मुहूर्तावर असा भव्य सोहळा! द्वारका शंकराचार्यांच्या पावन उपस्थित आणि श्री मयुरेश गुरुजी विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार ‘श्री बगलामुखी शतचंडी महायज्ञ’!

कोण आहेत द्वारकेचे शंकराचार्य?

पश्चिम पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती जी महाराज हे सनातन धर्माचे सर्वोच्च मार्गदर्शक गुरु आहेत.

अहिल्यानगरमध्ये ऐतिहासिक आगमन व महायज्ञ वेळापत्रक

स्थळ: मिस्कीन मळा, गंगा उद्यान जवळ, अहिल्यानगर

१. जगद्गुरू शंकराचार्य आगमन व दर्शन सोहळा:
दिनांक: ३० नोव्हेंबर २०२६
वेळ: सायंकाळी ७ वाजता

२. श्री बगलामुखी शतचंडी महायज्ञ:
दिनांक: ०१ डिसेंबर २०२६
कार्यक्रम प्रारंभ: सकाळी १० वाजता
पूर्णाहुती: सायंकाळी ५ वाजता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here