Accident : पाथर्डी-बीड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार युवक ठार

Accident : पाथर्डी-बीड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार युवक ठार

0
Accident : पाथर्डी-बीड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार युवक ठार
Accident : पाथर्डी-बीड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार युवक ठार

Accident : पाथर्डी : पाथर्डी-बीड राज्य महामार्गावर करोडी व मोहटे गावादरम्यान मोहटे शिवारात खाडीचे लवान येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार २२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहित बाबासाहेब सोनटक्के (रा. वरूर, ता. शेवगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.

हेही वाचा : कोपरगावात कोल्हे-काळे गट आमने-सामने; भूमिपूजनावरून जोरदार धक्काबुक्की

ट्रक चालकाचे पलायन (Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित सोनटक्के हा जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करत होता. पाथर्डी तालुक्यातील कुत्तरवाडी येथे काम आटोपून तो दुचाकीवरून पाथर्डी मार्गे आपल्या गावी जात असताना मोहटे शिवारात समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत रोहित याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून ट्रकसह पलायन केले. मात्र, नंतर राष्ट्रीय महामार्गावरील अकोला फाटा येथे ट्रक सोडून चालक पसार झाल्याचे समोर आले.

नक्की पहा : लेन्सकार्ट’ला नगरसेवक निखिल वारेंनी विचारला जाब; व्यवस्थापकांनी दिले हे उत्तर

दुचाकीचा पूर्णतः चुराडा (Accident)

घटनेची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप कानडे व पोलीस कॉन्स्टेबल अशोक बडे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात हलवला. दरम्यान, पोलिसांनी शोधमोहीम राबवून संबंधित ट्रक अकोला फाटा येथे जप्त केला आहे. या अपघातात दुचाकीचा पूर्णतः चुराडा झाला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप कानडे करीत आहेत.