Accident : नगर : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar city) गजबजलेल्या दिल्ली गेट परिसरात () रविवारी रात्री ब्रेक फेल झाल्याने एका ट्रकचा अपघात (Accident) झाला. या घटनेत ट्रक तसेच एका दुचाकीचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नक्की वाचा : सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या : विखे पाटील
धडकेमुळे दुचाकीचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक दिल्ली गेट परिसरातून जात असताना अचानक त्याचे ब्रेक निकामी झाले. चालकाने वाहनावरील नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रक पुढे जाऊन दुचाकी व दुभाजकाला धडकला. धडकेमुळे दुचाकीचे नुकसान झाले, तर ट्रकचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वाहतूक शाखेचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल (Accident)
घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अपघातामुळे काही काळ दिल्ली गेट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पोलिसांनी ट्रक बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.



