
Anna Hazare : नगर : ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी येथे मोफत रोगनिदान व आरोग्य तपासणी शिबिराचे (Health Check-up Camp) आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे (Mangesh Chivate) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिबिरात सुमारे १ हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या.
नक्की वाचा : पारनेर बस स्थानकावर मोकाट कुत्र्यांचा हैदोस; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

नागरिकांचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्रभर विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवत असून, त्याचाच एक भाग म्हणून अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये जनरल तपासणी, हृदयरोग तपासणी, मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप, रक्तदाब व मधुमेह तपासणी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग स्टिकचे वितरण आदी सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

चिवटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून जनसेवेच्या कार्याचे कौतुक (Anna Hazare)
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कार्यक्रमाशी संवाद साधत अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “ अण्णांना निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या आयुष्याची शतकी वाटचाल पूर्ण होवो,” अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. तसेच मंगेश चिवटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून राबविण्यात येणाऱ्या जनसेवेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रुग्णसेवा, जनजागृती आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश देणारे हे शिबिर अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांपैकी एक उल्लेखनीय उपक्रम ठरला. यावेळी डॉ. लोंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. यांच्यासह टीम आणि गावचे सरपंच जयसिंग मापारी,दत्ताभाऊ आवारी,लाभेश औटी आदी उपस्थित होते.


