Accused Apprehended : श्रीगोंदा : गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस नेहमीच वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत असतात, याचाच प्रत्यय नुकताच श्रीगोंद्यात आला. तब्बल १६ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत फरार आरोपीला पकडण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांच्या (Shrigonda Police) विशेष पथकाने थेट ‘वेशांतर’ केले. पोलिसांच्या या फिल्मी स्टाईल गनिमी काव्यामुळे (Guerrilla warfare) कौठा येथील राहत्या घरातून उद्धव बाळासाहेब जठार (वय ४० वर्षे, रा. कौठा, ता. श्रीगोंदा) याच्या अखेर मुसक्या आवळण्यात (Accused Apprehended) आल्या आहेत.
नक्की वाचा : पीएम-किसान योजनेचा २३ वा हप्ता वितरित; संगमनेरमधील ५९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ११.८८ कोटी जमा
वेशांतर करून गावात प्रवेश
आरोपी उद्धव जठार हा श्रीगोंदा न्यायालयातील जुन्या खटल्यात गेल्या १६ वर्षांपासून फरार होता. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात ‘विशेष फरार आरोपी शोध मोहीम’ सुरू केली आहे. या दरम्यान, हा आरोपी आपल्या कौठा येथील घरी आल्याची गुप्त माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली.आरोपी अत्यंत चलाख असल्याने नेहमीच्या पोशाखात गेल्यास तो पुन्हा पसार होण्याची भीती होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेशांतर करून गावात प्रवेश केला आणि त्याच्या घरावर पाळत ठेवली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आरोपीच्या घराभोवती वेढा (Accused Apprehended)
पोलिसांचा वेषातील पथकाने संशय येऊ न देता घराभोवती असा काही वेढा आवळला की, आरोपीला पळून जाण्याची साधी संधीही मिळाली नाही. पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून त्याला जागेवरच जेरबंद केले. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर, पोलीस कर्मचारी गहिनीनाथ यादव, संदीप राऊत, विवेक दळवी, महादेव कोहक आणि मोरे, भांडवलकर, नितीन नरुटे, गीतांजली लाड व शरद चोभे यांनी सहभाग घेतला.



