नगर : आता लग्नपत्रिकेवरती नवरा नवरीच्या नावापुढे ही जन्मतारीख (Couple Age Mandatory) लिहावी लागणार आहे. राजस्थान सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकार देखील या निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. बालविवाहाबाबत धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आहे. परिणामी या निर्णयामुळे वर आणि वधूचे वय कळू शकणार आहे. त्यामुळे बालविवाहाला (Child Marriage) आळा बसणार असा दावा केला जात आहे.
नक्की वाचा : १ जुलैपासून खिशाला कात्री; रेल्वे तिकिटांपासून LPG पर्यंत बदलणार ७ नियम
राज्यातील अनेक जिल्ह्यांत बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक (Wedding Card Couple Age Mandatory)
दुसरीकडे, राज्यात बालविवाहाबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. परभणी जिल्हात ४८% मुलींचे अल्पवयात लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांत बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती विधानसभेत सरकारने सादर केली आहे. बालविवाह कायद्याने गुन्हा असून समोर आलेली आकडेवारी धक्कादायक आहे. परिणामी कायद्याची अंमलबजावणी काटेकरपणे व्हावी, या अनुषंगाने या नव्या निर्णयाची तयारी राज्य सरकारने केली आहे.
अवश्य वाचा : दफनविधी नंतर ‘मृत’ शब्बीर जिवंत परतला! राहुरीत दफन केलेला मृतदेह कुणाचा?

कोणत्या जिल्ह्यात किती बालविवाह? (Wedding Card Couple Age Mandatory)
-परभणीत ४८ %,
-बीडमध्ये ४३.७ %,
-धुळ्यात ४०.५ %
-सोलापुरात ४०.३ % मुलींचे १८ वर्षांपूर्वी विवाह झाल्याची माहिती समोर आली आहे.
लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक
बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर परिणाम होत असल्याच सरकारकडून मान्य करण्यात आले आहे. तर बालविवाह रोखण्यासाठी राज्यात कायदा, नियम व विशेष जनजागृती मोहीम राबविली जात असल्याची माहिती देण्यात आलीय. त्यामुळे राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या प्रस्ताव सरकारकडून देण्यात आला आहे.



