ADCC Bank Election : जिल्हा बँकेसाठी आज मतदान, राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

ADCC Bank Election : जिल्हा बँकेसाठी आज मतदान, राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

0
ADCC Bank Election : जिल्हा बँकेसाठी आज मतदान, राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
ADCC Bank Election : जिल्हा बँकेसाठी आज मतदान, राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

ADCC Bank Election : नगर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (ADCC Bank Election) आज मतदान (Voting) प्रक्रिया पार पडणार असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी एकूण ३ हजार ८३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ३३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बँकेवर कोणाचे वर्चस्व राहणार याची उत्सुकता (ADCC Bank Election)

या निवडणुकीत राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले विखे-थोरात यांचे सहकार पॅनल आणि खासदार निलेश लंके यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेवर वर्चस्व कोणाचे राहणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या संपूर्ण निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत पारनेर मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. कारण या मतदारसंघातून स्वतः खासदार निलेश लंके निवडणूक लढवत असून, त्यांच्या विरोधात भाजप नेते सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे मैदानात आहेत. जिल्हा बँकेची ही निवडणूक केवळ सहकारातील सत्तेची लढाई न राहता राजकीय प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची लढाई बनली आहे.