Sujay Vikhe Patil : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड सर्वांना धक्का देणारी ठरेल : सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड सर्वांना धक्का देणारी ठरेल : सुजय विखे पाटील

0
Sujay Vikhe Patil : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड सर्वांना धक्का देणारी ठरेल : सुजय विखे पाटील
Sujay Vikhe Patil : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड सर्वांना धक्का देणारी ठरेल : सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil : नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या (ADCC Bank) अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर सर्वांना धक्का बसेल, असे सूचक विधान माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केले आहे. अध्यक्ष कोण होणार, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. मात्र, जो कोणी अध्यक्ष होईल, तो सर्वांच्या विचारानेच होईल. आम्ही पदाच्या मोहापोटी राजकारण करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँक ही सर्वांना न्याय देणारी संस्था

सुजय विखे पाटील आज अहिल्यानगर येथील आयुर्वेद महाविद्यालयात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या दहा जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. गेल्या दहा दिवसांत झालेल्या बैठकांमध्ये कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले नाहीत. शेतकरी आणि ठेवीदारांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी ठरवलेल्या आचारसंहितेचे पालन केले आहे. जिल्हा बँक ही सर्वांना न्याय देणारी संस्था असून आज शांततेत मतदान सुरू आहे. निवडणुकीत विजय आणि पराभव होतच असतो. त्यामुळे निकाल मनाला लावून घेण्याची गरज नाही, असे विखे म्हणाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

काही ठिकाणी समन्वय साधण्यात उशीर (Sujay Vikhe Patil)

जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध होण्याची परंपरा आहे. सर्वांनी एकत्रित राहून काम केले, तरच अहिल्यानगर जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. जामखेडची निवडणूक बिनविरोध करण्यात आम्हाला यश आले; मात्र काही ठिकाणी समन्वय साधण्यात उशीर झाला. त्यामुळे सर्व जागांवर बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली.

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला म्हणून कोणाशीही माझी स्पर्धा नाही. अखेर मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे महत्त्वाचे आहे. जिल्हा बँकेचे मतदार सुज्ञ आणि वैचारिक आहेत. कोणाच्याही सांगण्यावरून किंवा दबावाखाली ते निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.

विरोधकांकडून होत असलेल्या टीकेबाबत विचारले असता, प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही ज्या राजकीय संस्कृतीत वाढलो, त्यानुसार आम्हाला जे योग्य वाटले ते केले. कोणाचीही मक्तेदारी नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेने प्रत्येकाची संस्कृती, वर्तन आणि वक्तृत्व पाहिले आहे. त्यामुळे मतदार योग्य तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या नव्या संचालक मंडळाची पहिलीच ठरावाची भूमिका बँकेचे नाव अहमदनगरऐवजी अहिल्यानगर करण्याची असेल, असेही सुजय विखे पाटील यांनी सांगितले. राज्याच्या राजकारणात काही ठिकाणी महायुतीला यश मिळत आहे, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीला मतदारांनी नाकारले आहे. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील समन्वय आणि मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.

अध्यक्षपदासाठी सध्या विविध चर्चांना उधाण आले असले, तरी अंतिम निर्णय सर्वांच्या सहमतीनेच घेतला जाईल. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आताच अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही, असेही विखे यांनी स्पष्ट केले.