Ahilyanagar Jilha Vachnalay : अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या अध्यक्षपदी डॉ. राजा ठाकूर; राहुल तांबोळी सहसचिवपदी सर्वानुमते निवड

Ahilyanagar Jilha Vachnalay : अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या अध्यक्षपदी डॉ. राजा ठाकूर; राहुल तांबोळी सहसचिवपदी सर्वानुमते निवड

0
Ahilyanagar Jilha Vachnalay : अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या अध्यक्षपदी डॉ. राजा ठाकूर; राहुल तांबोळी सहसचिवपदी सर्वानुमते निवड
Ahilyanagar Jilha Vachnalay : अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या अध्यक्षपदी डॉ. राजा ठाकूर; राहुल तांबोळी सहसचिवपदी सर्वानुमते निवड

Ahilyanagar Jilha Vachnalay : अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा वाचनालय (Ahilyanagar Jilha Vachnalay) या प्रतिष्ठित संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आयुर्वेद क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व डॉ. राजा ठाकूर (Dr. Raja Thakur) यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच राहुल तांबोळी (Rahul Tamboli) यांची सहसचिवपदी सर्वानुमते निवड झाल्याने दोघांवरही विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव

डॉ. राजा ठाकूर हे गेली अनेक वर्षे अहिल्यानगर जिल्हा वाचनालयात सहकार्यवाह व संचालक म्हणून कार्यरत असून संस्थेच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ आता अध्यक्ष म्हणून संस्थेला मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दुर्गम भागात सामाजिक सेवेचे कार्य (Ahilyanagar Jilha Vachnalay)

डॉ. ठाकूर यांनी अकोले तालुक्यातील वनवासी कल्याण आश्रमामार्फत दुर्गम भागात सामाजिक सेवेचे उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये अनेक वर्षे सक्रियपणे कार्यरत राहून युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी योगदान दिले आहे. देशपातळीवरील आयुर्वेद व्यासपीठाच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून विविध जबाबदारीच्या पदांवर कार्य करत आयुर्वेद क्षेत्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. सावेडी येथील धर्माधिकारी मळ्यात साकारलेल्या प्रसिद्ध ‘धन्वंतरी उद्यान’ उभारणीतही त्यांचा प्रमुख सहभाग राहिला आहे.

जिल्हा वाचनालयाच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर कार्यवाह विक्रम राठोड यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष डॉ. राजा ठाकूर व सहसचिव राहुल तांबोळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष दिलीप पांढरे, अनंत देसाई, खजिनदार तनवीर खान, किरण अग्रवाल, शिल्पा रसाळ, प्रा. ज्योती कुलकर्णी, प्रा. मेधा काळे, अजित रेखी, डॉ. शैलेंद्र पाटणकर, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून जिल्हा वाचनालयाच्या उपक्रमांना अधिक गती मिळेल, वाचन संस्कृतीला चालना देणारे नवे उपक्रम राबविले जातील आणि वाचनालयाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला.