Ahilyanagar News: वाळकीतील गोशाळेत धक्कादायक घटना ; चारा-पाण्यासाठी दिलेली जनावरे पैसे घेऊन सोडून दिले

0
Ahilyanagar News: वाळकीतील गोशाळेत धक्कादायक घटना ; चारा-पाण्यासाठी दिलेली जनावरे पैसे घेऊन सोडून दिले
Ahilyanagar News: वाळकीतील गोशाळेत धक्कादायक घटना ; चारा-पाण्यासाठी दिलेली जनावरे पैसे घेऊन सोडून दिले

नगर :  “वाळकी गो शाळेत नेमकं चाललंय काय? चारा-पाण्यासाठी आणलेली जनावरे गायब? आणि त्याबदल्यात पैशांची देवाणघेवाण झाल्याचा प्रकार समोर आलाय. न्यायालयाचा कोणताही आदेश नसताना चारा-पाण्यासाठी ताब्यात दिलेल्या १२ जनावरांची २० हजार रुपये घेऊन परस्पर सुटका केल्याचा प्रकार (Ahilyanagar News) समोर आला आहे. याप्रकरणी वाळकी (Walki) येथील लक्ष्मी माता गोशाळेचे चालक चांगदेव गोरख भालसिंग याच्यासह पाच जणांविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नक्की वाचा : अहिल्यानगरमधील १७ वर्षीय मुलीने दिला बाळाला जन्म;प्रकरण काय?

प्रकरण काय? (Ahilyanagar News)

साताऱ्यातील कराड येथून नितेश बबन वैरागर व त्याचा साथीदार हे एका टेम्पोतून १२ म्हशी घोडेगावला येथे नेत होते. दौंड पोलिसांनी या म्हशींची वाहतूक करताना त्यांना पकडले. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे जनावरे पकडल्यांनंतर न्यायालयाचा आदेश येईपर्यंत या १२ म्हशींचा सांभाळ करण्यासाठी त्या भालसिंग चांगदेव यांच्या गोशाळेत जमा केल्या होत्या. जोपर्यंत न्यालयाचा आदेश येत नाही तोपर्यंत ही जनावरे कुणालाही नेऊ देण्याची मुभा देण्यात आली नव्हती. मात्र म्हशींचा मालक नितेश वैरागर आणि शरद आल्हाट यांनी गोशाळा चालक चांगदेव भालसिंग याच्याशी संपर्क साधला होता. भालसिंग याने ‘न्यायालयातून म्हशी सोडवायला वेळ लागेल, मी आजच तुमच्या म्हशी देतो’ असे सांगून त्यांच्याकडून २० हजार रुपये घेऊन त्यांना म्हशी ताब्यात दिल्या होत्या.

अवश्य वाचा : लोणावळ्याला जाताय? जरा जपून.. कलम १६३ लागू; ३१ जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध

‘डायल ११२’ वरुन पोलिसांना समजली घटना  (Ahilyanagar News)

हा सगळा प्रकार ‘डायल ११२’ वरुन पोलिसांना समजला. वाळकी शिवारातून दोन पिकअपमधून म्हशी नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गोशाळा चालक चांगदेव गोरख भालसिंग, नितेश बबन वैरागर, शरद जगन्नाथ आल्हाट, अमोल दशरथ कासार आणि शरद गुलाब साठे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.