Rainfall : नगर : ‘जुलै’च्या (July) सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अति वृष्टी (Heavy Rainfall) झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आत्तापर्यंत सरासरी (Average) पेक्षा कमी पाऊस (Rain) झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांचा समावेश आहे.
नक्की वाचा : विजेच्या धक्क्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; संबंधितांवर कारवाईची मागणी
कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता
राज्यातील बहुतांश भागांमध्ये आठ जुलैपासून पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात पहिल्या अर्ध्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शोतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे (Rainfall)
शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.



