Pune News : पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर; कारण काय?

0
Pune News : पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर; कारण काय?
Pune News : पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर; कारण काय?

नगर : पुणे (Pune News) जिल्ह्यातील आळंदी आणि देहू या ठिकाणी निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे वारकऱ्यांची राहण्याची सोय पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये (Municipal Schools) करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या १०१ शाळांना पुढचा आठवडाभर सुट्टी (Holiday for 101 schools) देण्यात आली आहे. मात्र शहरातील महापालिकेच्या इतर शाळा आणि सर्व खाजगी शाळा या कालावधीत सुरू राहणार आहेत. पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure) यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या हद्दीतील तब्बल १०१ शाळांना थेट रविवारपर्यंत पूर्ण सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगरमधील १७ वर्षीय मुलीने दिला बाळाला जन्म;प्रकरण काय?

वारकऱ्यांसाठी पुणे महापालिकेचा निर्णय (Pune News)

वारकऱ्यांसाठी पुणे महापालिकेचा निर्णय संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी या आषाढी वारीत सामील झाले आहेत.  मात्र, गेल्या चार पाच दिवसांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देहू आणि आळंदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूर संकटामुळे आळंदीत अडकलेल्या हजारो वारकरी आणि भाविकांच्या राहण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या संकटात वारकऱ्यांना सुरक्षित आश्रय देण्यासाठी पुणे महापालिकेने तातडीने पावले उचलली आहेत.

अवश्य वाचा : वाळकीतील गोशाळेत धक्कादायक घटना ; चारा-पाण्यासाठी दिलेली जनावरे पैसे घेऊन सोडून दिले

आळंदी आणि देहू परिसरातील पुराचा फटका बसलेल्या या वारकऱ्यांची आणि भाविकांची सोय थेट पुणे शहरात करण्यात आली आहे. वारीसाठी पुणे शहरात दाखल होणाऱ्या आणि पूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या राहण्यासाठी पुणे महापालिकेच्या तब्बल १०० पेक्षा जास्त शाळा तात्पुरत्या निवासस्थानात रूपांतरित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये वारकऱ्यांची राहण्याची, खाण्याची आणि आरोग्याची संपूर्ण व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. याचं सामाजिक आणि धार्मिक भान राखत प्रशासनाने या १०१ शाळांमधील विद्यार्थ्यांना रविवारपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून वारकऱ्यांच्या निवासात कोणताही अडथळा येणार नाही.

आळंदी देवस्थान प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केल आहे की, इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे तेथील सगळे पूल पाण्याखाली गेलेत, तर वारकऱ्यांना आम्ही विनंती करतोय की, आपण आळंदी देवस्थानाकडे न जाता पुण्यालाच यावं आणि इथे थांबावं. पुणे महानगरपालिकेकडून येणाऱ्या वारकऱ्यांची आपण सगळी व्यवस्था करतोय.  महानगरपालिकेच्या १०१ शाळांमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे आणि आजपासून पुढे रविवारपर्यंत त्या सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

महापौर मंजुषा नागापूरे काय म्हणाल्या? (Pune News)

पुण्याचे महापौर मंजुषा नागापूरे यावेळी म्हणाल्या की, सगळ्या पुणे शहरासाठी जे काही पाणी कपात होतं ते रद्द केलंय. पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल आणि रविवारनंतर पुन्हा पाण्याची व्यवस्था कशी आहे, त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल. सगळीकडे टॉयलेट्सची सुद्धा व्यवस्था झालेली आहे. तीन ठिकाणी मोठे जर्मन हँगर्सचे मांडव घातलेले आहेत, जिथे वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. पोलीस, ट्रॅफिक पोलिसांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे की, वारकरी आपल्याकडे येतील, त्यामुळे संपूर्ण शहराची ट्रॅफिकची व्यवस्था सुरळीत असावी, असं महापौरांनी म्हटलं आहे.