Little Girl Dies of Electric Shock : विजेच्या धक्क्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; संबंधितांवर कारवाईची मागणी

महावितरणचा गलथान कारभार

0
Little Girl Dies of Electric Shock : विजेच्या धक्क्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; संबंधितांवर कारवाईची मागणी
Little Girl Dies of Electric Shock : विजेच्या धक्क्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; संबंधितांवर कारवाईची मागणी

Little Girl Dies of Electric Shock : नगर : अहिल्यानगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील आनंद नगर परिसरात सोमवारी (ता. ६) सकाळी विजेचा धक्का लागल्याने एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू (Little Girl Dies of Electric Shock) झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party)शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी राष्टवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

नक्की वाचा : प्रवीणऋषिजी म.सा. यांचे सावेडी येथे भक्तिमय स्वागत; समर्पण चातुर्मासाला उत्साहात प्रारंभ

महावितरणचा गलथान कारभार

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकली परिसरात खेळत असताना विद्युत खांबाला हात लागून तिला विजेचा धक्का बसला. गंभीर अवस्थेत तिला तत्काळ उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. खेळण्या-बागडण्याच्या वयातच काळाने या निष्पाप जीवाला हिरावून नेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त होत महावितरणच्या गलथान कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी (Little Girl Dies of Electric Shock)

घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शिवसेना नेते संभाजी कदम महावितरणच्या अधिकाऱ्यांवर आरोप करत म्हणाले की, परिसरातील धोकादायक विद्युत खांबांच्या समस्यांबाबत वारंवार निवेदने देऊनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. पुढे ते म्हणाले की, विजेच्या धक्क्यात मृत्यू पावलेल्या चिमुकलीच्या कुटुंबियांना महावितरणने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी आणि संबंधितांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी नितीन भुतारे आणि परेश लोखंडे महावितरण प्रशासनावर चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संपत बारस्कर यांनी आक्रमक होत महावितरण प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी नगरसेवक मयूर बांगरे म्हणाले की, महावितरणला वेळोवेळी निवेदन देऊनही महावितरणकडून कुठलाच प्रतिसाद मिळात नाही. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आज एका निष्पाप चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला असा आरोप त्यांनी केला. जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यालयातून हलणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.