
Samarpan Chaturmas : नगर : अहिल्यानगर शहरात समर्पण चातुर्मासाच्या (Samarpan Chaturmas) निमित्ताने प्रवीणऋषिजी म.सा. आदि ठाणा-२ यांचे महावीरजी कांतीलालजी कासवा यांच्या सावेडी (Savedi) येथील निवासस्थानी अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात स्वागत करण्यात आले.
नक्की वाचा : अमली पदार्थांविरोधात जनजागृतीसह कठोर कारवाई करा : दादासाहेब गिते
जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित
या कार्यक्रमाची सुरुवात सावेडी नाक्यापासून मंगल प्रवेशयात्रेने झाली. प्रवेशयात्रेनंतर प्रवीणऋषिजी म.सा. आदि ठाणा-२ यांचे प्रवचन झाले. प्रवचनात संयम, सदाचार, धर्माचरण आणि आत्मकल्याणाचा प्रेरणादायी संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या सोहळ्यास अहिल्यानगर शहर व परिसरातील जैन समाजातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समर्पण चातुर्मासाच्या प्रारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कासवा परिवाराचे विशेष परिश्रम (Samarpan Chaturmas)
प्रवचनानंतर उपस्थित भाविकांसाठी कासवा परिवारातर्फे प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अक्षय महावीरजी कासवा, मयूर महावीरजी कासवा व संपूर्ण कासवा परिवाराने विशेष परिश्रम घेतले.


