Ahilyanagar Municipal Corporation : 20 वर्षांनंतर शहराचा नवा विकास आराखडा; 30 जुलैच्या महासभेत मंजुरीची शक्यता

Ahilyanagar Municipal Corporation : 20 वर्षांनंतर शहराचा नवा विकास आराखडा; 30 जुलैच्या महासभेत मंजुरीची शक्यता

0
Ahilyanagar Municipal Corporation : 20 वर्षांनंतर शहराचा नवा विकास आराखडा; 30 जुलैच्या महासभेत मंजुरीची शक्यता
Ahilyanagar Municipal Corporation : 20 वर्षांनंतर शहराचा नवा विकास आराखडा; 30 जुलैच्या महासभेत मंजुरीची शक्यता

Ahilyanagar Municipal Corporation: अहिल्यानगर: तब्बल दोन दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या अहिल्यानगर शहराच्या नव्या विकास आराखड्याला अखेर अंतिम टप्पा गाठला आहे. महापालिकेने शहरासह हद्दवाढीनंतर समाविष्ट झालेल्या सर्व उपनगरांचा विचार करून प्रारूप विकास आराखडा (Draft Development Plan) तयार केला असून, तो 30 जुलै रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. महासभेची संमती मिळाल्यानंतर हा आराखडा नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यावर सूचना तसेच हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरू होईल.

प्रत्येक वीस वर्षांनी विकास आराखडा करणे आवश्यक (Ahilyanagar Municipal Corporation)

महापालिका क्षेत्राचा विस्तार, वाढती लोकसंख्या, बदलती नागरी गरज आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या वीस वर्षांत शहराची रचना मोठ्या प्रमाणात बदलली असून, त्यानुसार सार्वजनिक सुविधा, रस्ते, उद्याने, शैक्षणिक संस्था, आरोग्य सुविधा आणि इतर नागरी पायाभूत सुविधांसाठी आवश्यक नियोजन या आराखड्यात करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी महापालिका स्थापन झाल्यानंतर 2005 मध्ये पहिला विकास आराखडा लागू करण्यात आला होता. त्यानंतर शहराच्या हद्दवाढीनंतर 2012 मध्ये सुधारित आराखडा तयार करण्यात आला. मात्र त्यानंतर नव्या विकास आराखड्याची प्रक्रिया रखडली होती. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक वीस वर्षांनी विकास आराखडा अद्ययावत करणे आवश्यक असल्याने महापालिकेने नव्या आराखड्याची प्रक्रिया हाती घेतली.

7 मार्च 2024 रोजी महासभेत विकास योजनेचा प्रस्ताव मंजूर (Ahilyanagar Municipal Corporation)

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 मधील कलम 23(1) नुसार सुधारित विकास योजना तयार करण्याचा इरादा 7 मार्च 2024 रोजी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर नगर रचना विभागाने शहराचे सविस्तर सर्वेक्षण करून विद्यमान जमीन वापराचा नकाशा तयार केला. हा नकाशा 14 ऑगस्ट 2025 रोजी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. त्यावर आधारित प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्याच्या प्रसिद्धीसाठीचा प्रस्ताव यापूर्वी प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

या नव्या आराखड्यात जुन्या 346 आरक्षणांचे फेरमूल्यांकन करण्यात आले असून, ज्या ठिकाणी गरज बदलली आहे तेथे आरक्षणांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हद्दवाढीनंतर शहरात समाविष्ट झालेल्या नव्या भागांमध्ये शाळा, रुग्णालये, उद्याने, रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि इतर नागरी सेवांसाठी नव्या आरक्षणांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या पुढील अनेक वर्षांच्या विकासाची दिशा या आराखड्यातून निश्चित होणार आहे.

30 जुलै रोजीच्या महासभेत प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी (Ahilyanagar Municipal Corporation)

30 जुलै रोजीच्या महासभेत प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर तो नागरिकांसाठी प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर ठरावीक कालावधीत नागरिक, संस्था, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांना सूचना व हरकती नोंदविण्याची संधी दिली जाईल. प्राप्त सूचना आणि हरकतींचा विचार करून आवश्यक बदल केल्यानंतर अंतिम विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.शहराच्या भविष्यातील नियोजनासाठी हा आराखडा महत्त्वाचा मानला जात असून, आगामी काही दशकांतील नागरी विकास, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधांच्या विस्तारासाठी तो मार्गदर्शक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here