दोन लाख ५० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Bribery : नगर : श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील (Shrirampur City Police Station) अधिकाऱ्याकडून येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणात आरोपी न करण्यासाठी दोन लाख ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर, खासगी व्यक्ती सुनील शिवाजी बोराडे व जगदिश तुकाराम बोराडे (दोघे रा. पाटोदा, ता. येवला, जि. नाशिक) यांच्या विरुद्ध येवला तालुका पोलीस ठाण्यात (Yeola Taluka Police Station) लाच लुचपत (Bribery) प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की
तक्रारदार यांचा भाऊ याच्या संदर्भात येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या या गुन्ह्यात आरोपी न करता असेच अटक न करणे करिता तक्रारदारांकडे संबंधित पोलीस अधिकाऱ्याने खासगी व्यक्ती मार्फत चार लाख रुपयांची लाचेची मागणी केली. सुनील बोराडे यांनी ९ एप्रिल रोजी फोन पे द्वारे ५० हजार रुपये स्वीकारले. तसेच तडजोडीअंती दोन लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना मान्य नसल्याने त्यांनी नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पोलीस उपनिरीक्षकासह दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल (Bribery)
या तक्राची संबंधित विभागाने सापळा रचून पडताळणी केली. या दरम्यान संबंधित व्यक्तीने लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. यानुसार येवला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकासह दोन खासगी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस निरीक्षक पुनम केदारे, पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, नितीन नेटारे, सुरेश चव्हाण, समीर शेख यांच्या पथकाने केली आहे.



