नगर : नगरकर (Ahilyanagar News) आता रांगेत उभं राहणं विसरा कारण जन्म-मृत्यूचा दाखला (Birth and Death Certificate) असो किंवा घराचं नवीन नळ कनेक्शन.(Tap Connection) तुम्हाला आता महापालिकेच्या फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही. फक्त एका क्लिकवर तुमचं हे सगळं काम होणार आहे. ते कसं? तेच आज सविस्तर जाणून घेऊ…
नक्की वाचा: अरणगाव हादरलं! मुलानेच केली बापाची हत्या; नेमकं प्रकरण काय?
नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी सेवा हक्क दिनानिमित्त सावेडी प्रभाग समिती कार्यालय येथे ‘आदर्श आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्यात आलं आहे. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा आता त्यांच्या परिसरातच उपलब्ध होणार आहेत. या सेवा केंद्राचे उद्घाटन महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती वर्षा सानप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांसह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अवश्य वाचा: चोरट्याचा गेम ओव्हर! चोरी करायला आलेल्या चोरट्याला महिलेनेचं पकडले
महापौर ज्योती गाडे काय म्हणाल्या? (Ahilyanagar News)

यावेळी महापौर गाडे म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध सेवा पुरविल्या जातात. नागरिकांना अधिक वेगाने आणि त्यांच्या परिसरातच सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सावेडी प्रभाग समिती कार्यालयात आदर्श आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. लवकरच महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये अशाच प्रकारची सेवा सुविधा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
नागरिकांना कोणत्या सेवा मिळणार? (Ahilyanagar News)
महानगरपालिकेच्या माध्यमातून या ‘आदर्श आपले सरकार सेवा केंद्रातून तब्बल ७० ऑनलाइन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या सेवांमध्ये जन्म-मृत्यू दाखले, मालमत्ता कर आकारणी, विवाह नोंदणी, थकबाकी नसल्याचा दाखला, नळ कनेक्शन तसेच इतर महत्त्वाच्या सेवांचा समावेश आहे. या डिजिटल प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून, शासकीय कार्यालयातील फेऱ्या सुद्धा कमी होतील. सेवा वितरणात पारदर्शकता वाढेल आणि तक्रारींमध्येही घट होईल. महापालिका प्रशासन नागरिका भिमुख कामकाजासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील,असे यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.



