Devendra Fadnavis : अकोले : बालवयात हिमालयाच्या शिखरांना साद घालणे. त्यावरील गिर्यारोहणाची (Mountaineering) चढाई यशस्वीरित्या करणे हे निश्चितच कौतुकास्पद (Commendable) आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काढले.
नक्की वाचा : सोशल मीडियावर एआय फोटोंच्या माध्यमातून बदनामी; सायबर पोलिसांत फिर्याद
केदारकंठ हे हिमशिखर केले सर
त्र्यंबकेश्वर येथे जलसंपदा खात्याच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा कलश यात्रा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित शिशु विहार मराठी माध्यमाची विद्यार्थिनी माणिकर्णिका प्रवर देशपांडे हिला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी उत्तराखंड राज्यातील १२ हजार ५०० फूट उंचीवरील केदारकंठ हे हिमशिखर तिने नुकतेच सर केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
माणिकर्णिका हिने रचला राष्ट्रीय विक्रम (Devendra Fadnavis)
एवढ्या कमी वयात सर्व आव्हानांचा सामना करत हिमशिखर सर करून माणिकर्णिका हिने राष्ट्रीय विक्रम रचला आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. माणिकर्णिका ही अकोले तालुक्यातील हिंद सेवा मंडळ संचालित मॉडर्न हायस्कूलचे माजी प्राचार्य स्व. अनंतराव देशपांडे यांची पणती तर शिरीष व चंद्रशेखर देशपांडे यांची नात आहे. या कार्यक्रमास अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्वामी समर्थ गुरुकुल पिठाचे अण्णासाहेब मोरे, होळकर वंशाचे राजे आदी मान्यवर उपस्थित होते.



