
नगर: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष दिवंगत नरेंद्र दाभोलकर (Narendra dabholkar) यांची गोळ्या झाडून हत्या (Murder Case) करण्यात आली होती.हे प्रकरण देशभर चर्चेचा विषय ठरले होते.याप्रकरणी, सीबीआयच्या विशेष न्यायालायने याप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर (Sharad Kalaskar bail) यांना दोषी ठरवले होते. तर, इतर तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता यातील दोषी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर (Bail Granted) करण्यात आलाय. त्यामुळे आता त्याची सुटका होणार आहे.
नक्की वाचा: जन्म-मृत्यूचे दाखले ते नळ कनेक्शन मिळणार एका क्लिकवर!
शरद कळसकरला ५० हजारांच्या हमीवर जामीन मंजूर (Narendra Dabholkar Murder Case)

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरोपी वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयानं निर्दोष ठरवलेलं आहे. तर,सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. शरद कळसकरला विशेष न्यायालयाने २०२४ मध्ये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तसेच,आपल्या अपिलावर निर्णय येईपर्यंत जामीन देण्याची मागणी देखील कळसकर याच्या वकिलांनी केली होती. त्यानुसार,उच्च न्यायालयात झालेल्या जामीन अर्जावरील सुनावणीत शरद कळसकरला ५० हजारांच्या हमीवर जामीन मंजूर करण्यात आली आहे.
अवश्य वाचा: अरणगाव हादरलं! मुलानेच केली बापाची हत्या; नेमकं प्रकरण काय?
फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेप (Narendra Dabholkar Murder Case)
सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. तसेच या प्रकरणात सबळ पुराव्या अभावी तिघे जण निर्दोष सुटणे हे सीबीआयचं अपयश मानलं जात आहे.


