नगर : येथील (Ahilyanagar News) न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या (New Arts,commerce and science College) वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. भाग्यशाली अशोक कार्ले (Dr. Bhagyashali Karle) यांच्या हर्बल औषध संशोधनाला भारत सरकारकडून अधिकृत पेटंट मंजूर (Official patent from the Government of India) झाले आहे. भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने ७ ऑगस्ट २०२६ रोजी या संशोधनाचे पेटंट प्रमाणपत्र त्यांना दिले. या पेटंटसाठी त्यांनी एकमेव संशोधक म्हणून काम केले, ही विशेष बाब असून औषधशास्त्र विषयात ‘युटीलिटी पेटंट’ मिळणे ही विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी मानली जाते.
नक्की वाचा : शाळेचा माजी विद्यार्थीच ठरला विद्यार्थिनींसाठी ‘पॅडमॅन’; शाळेला दिली सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन भेट
भाग्यशाली कार्ले यांचे चार वर्षे सातत्याने संशोधन (Ahilyanagar News)


‘हर्बल कम्पोझिशन फॉर मायोकार्डियल प्रोटेक्शन अँड प्रोसेस फॉर प्रिपेअरिंग देअरऑफ’ या विषयावर डॉ. भाग्यशाली कार्ले यांनी संशोधन केले. हृदयाच्या स्नायू पेशींचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नैसर्गिक वनस्पतींचा वापर करून त्यांनी हे औषध तयार केले. त्याचबरोबर औषधाच्या निर्मिती प्रक्रियेचा या संशोधनात अभ्यास त्यांनी केला. पेटंटसाठी डॉ. कार्ले यांनी सुमारे चार वर्षे सातत्याने संशोधन केले. पुण्यातील नामांकित संस्थांमध्ये त्यांनी या संशोधनाचे काम केले. संशोधनासाठी त्यांना पुणे येथील डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च या संस्थेच्या डॉ. वैशाली उंडाळे, नाशिकच्या चिंचोली येथील पी.आर. इ. एस. कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. शरदचंद्र कार्ले आणि डॉ. विकास कुंदे, तसेच डॉ. दिगंबर अहिरे यांनी मार्गदर्शन केले.
अवश्य वाचा : शरद पवारांचे ८ खासदार पंतप्रधान मोदींची ‘या’ दिवशी घेणार भेट ; सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
भारत सरकारकडून २० वर्षांसाठी पेटंट मंजूर (Ahilyanagar News)


डॉ. भाग्यशाली कार्ले यांच्या पेटंट अर्जाला मान्यता देत भारत सरकारने २० वर्षांच्या कालावधीसाठी पेटंट मंजूर केले आहे. हर्बल औषध संशोधनाच्या क्षेत्रात डॉ. भाग्यशाली कार्ले यांनी मिळविलेले हे यश अहिल्यानगरच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे, सहसचिव इंजि. मुकेश मुळे तसेच प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी डॉ. कार्ले यांचे अभिनंदन केले आहे.



