Akole : लव्हाळी-पाचनई-हरिश्चंद्रगड मार्ग खुला; दरड हटवून वाहतूक पूर्ववत

0
Akole : लव्हाळी-पाचनई-हरिश्चंद्रगड मार्ग खुला; दरड हटवून वाहतूक पूर्ववत
Akole : लव्हाळी-पाचनई-हरिश्चंद्रगड मार्ग खुला; दरड हटवून वाहतूक पूर्ववत

Akole : नगर : अकोले तालुक्यातील लव्हाळी-पाचनई-हरिश्चंद्रगड मार्गावरील दरड हटवून हा रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तालुक्यात सुरू असलेल्या संततधार आणि अतिमुसळधार पावसामुळे लव्हाळी–पाचनई–हरिश्चंद्रगड–पेठेचीवाडी तसेच आंबित मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या.

नक्की पहा : हायवेवर पोलिसांकडून अपहरण झालेल्या पर्यटकांची अशी झाली सुटका

पर्यटकांची गैरसोय

रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मुरूम, माती आणि दगड साचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह हरिश्चंद्रगड परिसराकडे जाणाऱ्या पर्यटकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. या घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने युद्धपातळीवर काम करत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील मुरूम, माती आणि मोठे दगड बाजूला केले.

हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात झाली अवघी ५१ टक्के खरीप पेरणी

ग्रामस्थांसह पर्यटकांना दिलासा (Akole)

यंत्रणेच्या तात्काळ कारवाईमुळे हा मार्ग अल्पावधीतच वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. रस्ता पूर्ववत सुरू झाल्यामुळे लव्हाळी, पाचनई, हरिश्चंद्रगड, पेठेचीवाडी व आंबित परिसरातील ग्रामस्थांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, परिसरात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पुन्हा दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन वाहनचालकांनी आणि पर्यटकांनी प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.