Akole : आमदार लहामटे कुपोषित बालके घेणार दत्तक; दुर्गम भागातील बालकांच्या आरोग्यासाठी पुढाकार

Akole : आमदार लहामटे कुपोषित बालके घेणार दत्तक; दुर्गम भागातील बालकांच्या आरोग्यासाठी पुढाकार

0
Akole : आमदार लहामटे कुपोषित बालके घेणार दत्तक; दुर्गम भागातील बालकांच्या आरोग्यासाठी पुढाकार
Akole : आमदार लहामटे कुपोषित बालके घेणार दत्तक; दुर्गम भागातील बालकांच्या आरोग्यासाठी पुढाकार

Akole : अकोले : तालुक्यात ३८ बालके तीव्र तर २०० बालके मध्यम कुपोषित आहेत. ही बालके सर्वसाधारण होण्यासाठी अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग, आशा सेविकांना सोबत घेऊन सर्वांनी जबाबदारीने प्रयत्न करावे, असे आवाहन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी करत आपण स्वतः कुपोषित बालके दत्तक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथम

सतर्क राहण्याच्या सूचना

पोषण पंधरवडा सप्ताहानिमित्त आयोजित आहार किट वाटप कार्यक्रमात आमदार लहामटे बोलत होते. पंचायत समितीच्या सभागृहात कार्यक्रम पार पडला. सामूहिक प्रयत्नातून तालुका कुपोषणमुक्त करण्याच्या निर्धाराची प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. नैसर्गिक बाळंतपणाऐवजी सिझेरियन होईल, या भीतीने गर्भवती माता अमृत आहार योजनेचा योग्य उपयोग करून घेत नाहीत. समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. बाल उपचार केंद्र तातडीने सुरू करणे, बालकांना घरी आरोग्य सुविधा देणे याबाबत सतर्क राहावे, अशा सूचना आमदार लहामटे यांनी दिल्या.

नक्की पहा : शिवाजीराव कर्डिले यांचे जिव्हाळ्याचे गाव म्हणून मांजरसुंबा गावची ओळख – प्रियंका कर्डिले

योजनांबाबत मार्गदर्शन (Akole)

गटविकास अधिकारी अमर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे, ब्रिटानिया कंपनीचे जिल्हा समन्वयक, बालविकास प्रकल्प अधिकारी केदार नांगरे उपस्थित होते. बालविकास प्रकल्प प्रभारी अधिकारी अर्चना एखंडे यांनी प्रास्ताविक केले. कांता गिरी, सोनाली भनगडे, अश्विनी देशमुख, हिरा खतोडे, अंजना साळवे यांनी मूठभर धान्य, स्तनपान, बालविवाह याबाबत मार्गदर्शन केले.