Distribution of Certificates : नाशिक विभागात १९३३ अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण; शिक्षण व नोकरीत संधी

0
Distribution of Certificates : नाशिक विभागात १९३३ अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण; शिक्षण व नोकरीत संधी
Distribution of Certificates : नाशिक विभागात १९३३ अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण; शिक्षण व नोकरीत संधी

Distribution of Certificates : नगर : अनाथ प्रमाणपत्राच्या आधारे १ टक्का समांतर आरक्षण उपलब्ध होत असून त्यातून शिक्षण व शासकीय नोकरीत संधी मिळत आहे. नाशिक विभागात आतापर्यंत १९३३ बालकांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत, अशी महिला व बाल विकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी दिली.

हेही वाचा : राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथम

शिक्षण व नोकरीत संधी

१८ वर्षांखालील बालकाचे आई-वडील निधन पावल्यास त्या बालकाला अनाथ प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाते. या आरक्षणाचा लाभ व्यावसायिक शिक्षण, नियमित शिक्षण व नोकरीसाठी होत आहे. वितरित प्रमाणपत्रांपैकी ५८० लाभार्थी मुली आहेत. नाशिक विभागांतर्गत दिलेल्या प्रमाणपत्रांपैकी १६२ अनाथ प्रमाणपत्रधारकांना शासकीय नोकरी मिळाली आहे. त्यामुळे या योजनेचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना होत असल्याचे दिसून येते.

नक्की पहा : खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात

प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया (Distribution of Certificates)

अनाथ प्रमाणपत्रासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे आई-वडिलांच्या मृत्यूच्या दाखल्यासह प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यानंतर बालकल्याण समितीची शिफारस घेऊन विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास यांच्या माध्यमातून प्रमाणपत्र निर्गमित केले जाते.