अकोले : “सख्खा भाऊ झाला पक्का वैरी! ही म्हण आपण ऎकलॆली आहे. मात्र सध्याच्या काळात ही केवळ एक म्हण राहिलेली नाही तर सध्या अशा घटना सर्रास घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशीच एक घटना अकोले (Akole Crime News) तालुक्यातील खडकेवाडी (देवठाण) येथे घडलीय. इथे घडलेल्या बारकू दामू गिऱ्हे हत्या प्रकरणात (Murder Case) मयताचा चुलतभाऊ असलेल्या २६ वर्षीय काशिनाथ रामनाथ गिऱ्हे याला न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो सावध व्हा! सोयाबीन आणि कपाशीवर ‘या’ किडींचा प्रादुर्भाव वाढला
नेमकं काय घडलं? (Akole Crime News)

५ ऑक्टोबर २०२२ रोजी दसरा सणाच्या दिवशी सायंकाळी किरकोळ भांडणात खडकेवाडीतील बारकू दामू गिऱ्हे यांचा त्यांच्या घराच्या ओट्यावर काशिनाथ रामनाथ गिन्हे याने खून केला होता. याप्रकरणी ६ ऑक्टोबर २०२२ गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली होती. या खटल्याची सुनावणी संगमनेर जिल्हा न्यायालयामध्ये झाली. या प्रकरणी सरकारी वकिलांनी एकूण ७ साक्षीदार तपासले.
फिर्यादी व फिर्यादीची पुतणी सविता केरू पारधे, तसेच डॉ. सुरेखा एस. करवंदे यांची व तपासी अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, फिर्यादी व तिची पुतणी, डॉक्टर यांची साक्ष ग्राह्य धरण्यात आली, तसेच सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेक गव्हाणे यांनी या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अवश्य वाचा : डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टवर मनोज जरांगेंनीच व्यक्त केली शंका; नेमकं काय घडलं?
अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (Akole Crime News)
मयताची पत्नी इंदुबाई बारकू गिऱ्हे यांनी अकोले पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चुलत दीर काशिनाथ याने पती बारकू यांना आमच्या घराच्या दारात ओट्याजवळ खाली पाडून दगडाने डोक्यात मारले. त्यात जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितलय. “क्षणिक राग, नात्यातील कटुता आणि संयमाचा सुटलेला ताबा यामुळे आज एकाचं आयुष्य संपलं, तर दुसऱ्याचं संपूर्ण आयुष्य तुरुंगाच्या चार भिंतींत अडकलं आहे.



