All India Open Chess Tournament : मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेची नगरात रंगणार बौद्धिक लढत

All India Open Chess Tournament : मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेची नगरात रंगणार बौद्धिक लढत

0
All India Open Chess Tournament : मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेची नगरात रंगणार बौद्धिक लढत
All India Open Chess Tournament : मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेची नगरात रंगणार बौद्धिक लढत

रशियन ग्रँड मास्टर पेट्र किरियाकोव यांचे आकर्षण; एकाचवेळी ३० खेळाडूंविरुद्ध प्रदर्शनीय सामना

All India Open Chess Tournament : नगर : शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation) प्रायोजित मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा (All India Open Chess Tournament) बुधवार दि. २७ मे ते रविवार दि. ३१ मे २०२५ या कालावधीत अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्टेशन रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी दिली.

नक्की वाचा : १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्व. अरुणकाका साहित्य नगरीची तयारी पूर्ण

देशभरातील नामांकित बुद्धिबळपटू सहभागी होणार

या स्पर्धेत देशभरातील नामांकित बुद्धिबळपटू सहभागी होणार असून गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू, महाराष्ट्र आदी राज्यांतील दोनशेहून अधिक खेळाडूंनी आतापर्यंत आपला सहभाग निश्चित केला आहे. तसेच अनेक दिग्गज बुद्धिबळपटूही स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विविध वयोगटातील स्पर्धक (All India Open Chess Tournament)

विशेष म्हणजे अवघ्या साडेपाच वर्षांच्या बाल बुद्धिबळपटूपासून ते ७५ वर्षीय ज्येष्ठ खेळाडूपर्यंत विविध वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत आपल्या बुद्धीचे कौशल्य पणाला लावणार असल्याचे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले.


या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत रशियन ग्रँड मास्टर पेट्र किरियाकोव. त्यांच्या सहभागामुळे स्पर्धेचा दर्जा अधिक उंचावला असून बुद्धिबळप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ग्रँड मास्टर पेट्र किरियाकोव हे बुधवार दि. २७ मे रोजी सकाळी ९-३० वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे एकाचवेळी ३० खेळाडूंविरुद्ध प्रदर्शनीय सामना सुद्धा खेळणार आहेत.


स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दि. २७ मे रोजी सकाळी ११.३० वाजता होणार असून त्यानंतर स्पर्धेला प्रारंभ होईल. स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या खेळविण्यात येणार आहेत. अंतिम बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. ३१ मे रोजी दुपारी ३ वाजता अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते होणार आहे.


स्पर्धेतील विविध गटांतील विजेत्यांना रोख पारितोषिके, आकर्षक ८५ करंडके तसेच सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून प्रवीण ठाकरे (जळगाव) कार्यभार सांभाळणार असून त्यांना पवन राठी (पुणे) सहाय्यक पंच म्हणून सहकार्य करणार आहेत. त्यांच्यासोबत ६ सहाय्यक पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धा जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या नियमावलीनुसार पार पडणार आहे.


विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे १०० लाकडी बुद्धिबळ पट आणि सोंगट्यांचा वापर महाराष्ट्रात प्रथमच करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे सदस्य सुबोध ठोंबरे, पारूनाथ ढोकळे, शाम कांबळे, प्रशांत गंगेकर, देवेंद्र ढोकळे, मनीष जस्वानी, प्रकाश गुजराती, चेतन कड, संजय खडके, नवनीत कोठारी, डॉ. स्मिता वाघ, सौ. शुभदा ठोंबरे, सौ. रोहिणी अडकर आदी परिश्रम घेत आहेत.
अहमदनगर शहर व जिल्ह्यातील बुद्धिबळप्रेमी आणि खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी
यशवंत बापट- ९३२६०९२५०१
पारूनाथ ढोकळे- ९८५०७०४२६८
यांच्याशी संपर्क साधावा.