
AMC : नगर : महापालिका हद्दीत मालमत्ता खरेदीनंतर १ टक्का शुल्क भरून केली जाणारी मालमत्ता नोंदणी महापालिकेसाठी महत्त्वाचा महसुली स्रोत ठरत आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात शहरातील ३ हजार ४२० मालमत्ताधारकांनी महापालिकेकडे नोंदणी करून ५ कोटी २६ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. मालमत्ता व्यवहारांची वाढ, नोंदणी प्रक्रियेला मिळालेला प्रतिसाद यामुळे ही यंत्रणा अधिक प्रभावी ठरत असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
हेही वाचा : मुलींसाठी १२ वी सायन्स नंतरचे सर्वोत्तम पर्याय कोणते?
अशी आहे प्रक्रिया (AMC)
महापालिका हद्दीत मालमत्ता खरेदी केल्यानंतर तिची महसूल दरबारी नोंद झाल्यानंतर त्या मालमत्तेच्या एकूण खरेदी रकमेच्या १ टक्का शुल्क भरून महापालिकेत नोंदणी करावी लागते. शहरात दरवर्षी मालमत्तांची मोठ्या प्रमाणात खरेटी नोंदणी होते काटी मालमत्ताधारक मात्र, मालमत्ता खरेदी केल्यानंतर महापालिकेकडे नोंदणी करत नाहीत. त्यामुळे जुन्याच मालकाच्या नावाने घरपट्टी, पाणीपट्टीची बिले कार्यन्वित होतात. मालमत्ता नोंदणी न केल्यास पुढे कायदेशीर बाबीही उद्भवू शकतात. त्यामुळे नव्याने मालमत्ता खरेदी, वारस नोंदणी, बक्षीस पत्र, मृत्युपत्र आदींची महापालिकेच्या मालमत्ता विभाकडे नोंदणी आवश्यक आहे. याची नागरिकांनी दखल घ्यावी, असे आयुक्त डांगे यांनी सांगितले. महापालिकेच्या जुने कार्यालयात मालमत्ता नोंदणी विभाग असून करमूल्य निर्धारण विभागाच्या अतंर्गत हा कक्ष येतो. मालमत्ता नोंदणीसंदर्भात काही अडचण असल्यास सहाय्यक आयुक्त, अशोक साबळे, करमूल्य निर्धारण अधिकारी विनायक जोशी, लिपिक गाडे यांच्याशी नागरिक चौकशी करू शकतात.
नक्की पहा : वांबोरी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन पडले बंद
यांचे होणार नव्याने व्हॅल्युएशन (AMC)
शहरात बहुतांशी मालमत्ताधारकांनी पाच, दहा ते २० वर्षांपूर्वी मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत. आता पुढील प्रशासकीय तसेच कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांना महापालिकेकडे मालमत्ता नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा मालमत्ताधारकांचे नव्याने व्हॅल्युएशन करून त्यावर १ टक्का शुल्क आकारून नोंदणी करून घेतली जात असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.


