Kabaddi : नगर : अहिल्यानगर जिल्हा पुरुष कबड्डी संघाने २ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत सिन्नर (जि. नाशिक) येथे झालेल्या ७३ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट पुरुष व महिला अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील बलाढ्य संघांना पराभूत करून अंतिम विजेतेपद मिळविले.
हेही वाचा : अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी दिला चोप; अकोले तालुक्यातील घोटी-शिळवंडी येथील घटना
सलग पाचव्या वर्षे अंतिम फेरीत
या संघाने सलग पाचव्या वर्षी अंतिम फेरीत खेळताना तीन वेळा उपविजेता व दोनदा विजेतेपद मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. त्याचबरोबर जिल्ह्याच्या कुमार मुले संघाने २५ ते २९ नोव्हेंबर २०२५ बोपखेल (ता. पुणे) येथे झालेल्या ५२ व्या महाराष्ट्र राज्य कुमार, कुमारी गट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकाविले होते.
नक्की पहा : ईव्हीएम मशीन बंद पडताच उमेदवार मतदान केंंद्रावर दाखल
जिल्ह्याच्या किशोरी संघाने ५ ते ९ डिसेंबर २०२५ दरम्यान ३६ व्या महाराष्ट्र राज्य किशोर, किशोरी गट अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकाविले होते व किशोर संघाने ३६ व्या महाराष्ट्र राज्य किशोर, किशोरी गट अजिंक्यपदी निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला होता.
गौरव सोहळा (Kabaddi)
या ऐतिहासिक यशाबद्दल कबड्डीतील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते रविवारी (ता. २६) सायंकाळी चार वाजता अहिल्यानगर येथील सहकार सभागृहात अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने या खेळाडूंचा व प्रशिक्षकांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.



