AMC : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालकीच्या पिंपळगाव माळवी तलावातून विनापरवाना व अनधिकृतरित्या पाणी उपसा करणाऱ्यांविरुद्ध आज धडक कारवाई करण्यात आली. तलावातील पाण्याचा अवैध उपसा करण्यासाठी बसविण्यात आलेल्या मोटारी जप्त करण्याची कार्यवाही महापालिकेच्या संबंधित विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा : बिनविरोधवरून राजकीय नाट्य; दत्ता पानसरे यांचा आत्महत्येचा इशारा तर भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक
पाण्याचा बेकायदेशीर वापर
महानगरपालिकेच्या मालकीच्या जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत असून, तलावातील पाण्याचा बेकायदेशीर वापर रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. विनापरवाना पाणी उपसा केल्यामुळे जलसाठ्यावर ताण येत असून भविष्यात नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नक्की पहा : दत्ता पानसरे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या
मोटारी व साहित्य जप्त (AMC)
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी तलाव परिसराची पाहणी करून अवैधरीत्या बसविण्यात आलेल्या मोटारी व साहित्य जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. यापुढेही महापालिकेच्या मालकीच्या जलस्रोतांवर अतिक्रमण अथवा अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांविरुद्ध अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.



