Amol Khatal : आमदार खताळांकडून ‘एजंटगिरी’चा पर्दाफाश; तलाठी कार्यालयातील गंभीर प्रकार उघडकीस

Amol Khatal : आमदार खताळांकडून 'एजंटगिरी'चा पर्दाफाश; तलाठी कार्यालयातील गंभीर प्रकार उघडकीस

0
Amol Khatal : आमदार खताळांकडून 'एजंटगिरी'चा पर्दाफाश; तलाठी कार्यालयातील गंभीर प्रकार उघडकीस
Amol Khatal : आमदार खताळांकडून 'एजंटगिरी'चा पर्दाफाश; तलाठी कार्यालयातील गंभीर प्रकार उघडकीस

Amol Khatal : संगमनेर : शहरातील चावडी येथील तलाठी कार्यालयात (Talathi Office) शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र, संबंधित महिलेने आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांना मोबाईलवर मेसेज केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन ‘एजंटगिरी’चा पर्दाफाश (Exposing ‘Brokerage’) करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

नक्की वाचा : अशोक खरातला खाऊ घातले ‘शेणाचे लाडू’; अहिल्यानगरमध्ये अनोखे आंदोलन

या कामकाजात खाजगी व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप

चावडी येथील तलाठी कार्यालयात दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारायला लावले जात असून, ठिकठिकाणी अडवणूक करून पैसे मागितले जातात, अशी  माहिती आमदार खताळ यांना एका महिलेने व्हाट्सॲपद्वारे दिली. विशेष म्हणजे, या कामकाजात खाजगी व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला. या तक्रारीची दखल घेत आमदार खताळ यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली. मात्र, तेथे पोहोचल्यावर तलाठी व कोतवाल कोणीच हजर नसल्याचे दिसून आले. त्याऐवजी मन्सूर शेख हा व्यक्ती तेथे बसून शासकीय कागदपत्रे हाताळत असल्याचे आढळले. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तलाठ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना (Amol Khatal)

यावेळी आतमध्ये उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीला विचारणा केली असता, “मी मन्सूर शेख यांचा जावई आहे,” असे उत्तर देण्यात आले. यावर आमदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “तुम्हाला येथे बसण्याचा अधिकार कोणी दिला?” असा जाब विचारला. त्यावर “तलाठी उपस्थित नसल्याने आम्हीच काम पाहत होतो,” असे उत्तर देण्यात आले. या गंभीर प्रकारानंतर आमदार खताळ यांनी प्रांताधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे यांना तत्काळ फोन करून संबंधित तलाठ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

संबंधित दोघांवर कारवाई

शासकीय कागदपत्रांची पडताळणी खाजगी व्यक्तींमार्फत होणे हा अत्यंत गंभीर व बेकायदेशीर प्रकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सूचना मिळताच प्रशासनाने नायब तहसीलदार भांगरे यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर संबंधित दोघांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना पुढे त्याठिकाणी बसू न देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.